१८० उमेदवारी अर्ज दाखल निवडणूक : थोरात साखर कारखाना

By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:16+5:302015-02-14T23:52:16+5:30

संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी १५५ जणांचे एकूण १८० उमेदवारी अर्ज दाखल झाले.

180 nominations filed for election: Thorat sugar factory | १८० उमेदवारी अर्ज दाखल निवडणूक : थोरात साखर कारखाना

१८० उमेदवारी अर्ज दाखल निवडणूक : थोरात साखर कारखाना

गमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी १५५ जणांचे एकूण १८० उमेदवारी अर्ज दाखल झाले.
थोरात कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी १५ मार्चला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी शनिवारी शेवटच्या दिवशी १० गटांमधून १५५ जणांनी एकूण १८० उमेदवारी अर्ज दाखल केले. साकूर गटातून २१, जोर्वे गटातून ५०, तळेगाव गटातून २०, धांदरफळ गटातून २२, अकोले-जवळे गटातून १७, सहकारी संस्था प्रतिनिधी गटातून ५, अनुसूचित जाती-जमाती गटातून ६, महिला राखीव गटातून १२, इतर मागास प्रवर्ग गटातून १९, भटक्या जाती-जमाती, विशेष मागास प्रवर्ग गटातून ८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍यांमध्ये प्रामुख्याने सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे आमदार बाळासाहेब थोरात, गणपत सांगळे, रामदास वाघ, सोन्याबापू वाक्चौरे, मधुकर नवले तर विरोधकांकडून शिवसेनेचे डॉ. भानुदास डेरे, स्वाभिमान मंडळाचे शरद थोरात यांचा समावेश आहे. १६ फेब्रुवारीला अर्जांची छानणी होईल. १८ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान माघारीची मुदत आहे. माघारीनंतर निवडणूकीचे चित्र स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)

Web Title: 180 nominations filed for election: Thorat sugar factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.