बोअरवेलमध्ये १८ वर्षांची तरुणी पडली; 500 फुटांवर जाऊन अडकली, वाचविण्याचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 15:53 IST2025-01-06T15:53:18+5:302025-01-06T15:53:30+5:30
थोड्या थोडक्या नाही तर तब्बल ५०० फुटावर जाऊन ही तरुणी अडकली आहे. तिला वाचविण्याचे प्रयत्न सुरु झाले असून बोअरवेलमध्ये कॅमेरा सोडून तरुणीची परिस्थिती जाणून घेतली जात आहे.

बोअरवेलमध्ये १८ वर्षांची तरुणी पडली; 500 फुटांवर जाऊन अडकली, वाचविण्याचे प्रयत्न
गुजरातच्या भूजमध्ये विचित्र घटना घडली आहे. पाण्यासाठी खोदलेल्या बोअरवेलमध्ये आतापर्यंत लहान मुले पडत असल्याचे व त्यांना वाचविण्याचे प्रयत्न करण्यात आल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. परंतू, कंडेराय गावात १८ वर्षांची तरुणी बोअरवेलच्या खड्ड्यात खोलवर पडली आहे.
थोड्या थोडक्या नाही तर तब्बल ५०० फुटावर जाऊन ही तरुणी अडकली आहे. तिला वाचविण्याचे प्रयत्न सुरु झाले असून बोअरवेलमध्ये कॅमेरा सोडून तरुणीची परिस्थिती जाणून घेतली जात आहे. तिच्यापर्यंत ऑक्सिजनही पोहोचविला जात आहे. भुज अग्निशमन विभागाचे जवान या कामी लागले आहेत.
ही तरुणी ५०० फूट खोल बोअरवेलमध्ये कशी गेली याचा देखील विचार केला जात आहे. तरुणीला वाचविण्यासाठी गांधूनगरहून एनडीआरएफची टीम रवाना झाली आहे. बीएसएफचे अधिकारी देखील पोहोचले आहेत. आतमध्ये पडलेली तरुणी कशी आहे, तिला दुखापत झालीय की नाही, ती जिवंत आहे का याबाबत काहीही माहिती मिळालेली नाहीय.
या तरुणीचा नुकताच साखरपुडा झाला होता. रविवारी रात्री या दोघांमध्ये वाद झाला होता. यामुळे या तरुणीने बोअरवेलमध्ये उडी मारली असावी असेही सांगितले जात आहे. सकाळी तरुणीचा भाऊ बाथरुमला जाण्यासाठी उठला होता. जेव्हा तो खोलीत परतत होता तेव्हा त्याला जोराने किंचाळ्या ऐकू आल्या होत्या. बोअरवेलला मोठमोठ्या दगडांनी भिंत करण्यात आली होती. एवढे असूनही १८ वर्षांची तरुणी यात कशी पडली ही बाब सर्वांना आश्चर्यचकीत करत आहे.