रांचीत १८ जिवंत बॉम्ब हस्तगत
By Admin | Updated: June 8, 2014 00:05 IST2014-06-08T00:02:47+5:302014-06-08T00:05:15+5:30
राष्ट्रीय तपास संस्थेने(एनआयए) रांचीत शनिवारी १८ जिवंत बॉम्ब हस्तगत केले.

रांचीत १८ जिवंत बॉम्ब हस्तगत
चौघांना अटक : मोदी रॅलीतील बॉम्बस्फोटांशी संबंध
नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने(एनआयए) रांचीत शनिवारी १८ जिवंत बॉम्ब हस्तगत केले. गेल्यावर्षी पाटण्यात नरेंद्र मोदी यांच्या रॅलीच्यावेळी बॉम्बस्फोट मालिका घडविण्यात आल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सिमी आणि इंडियन मुजाहिदीनशी संबंधित हैदर अली ऊर्फ ब्लॅक ब्युटी याने त्याबाबत माहिती दिली होती.
हैदरसह चौघांना एनआयएने ताब्यात घेतले असून, त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सदर दोन संघटनांशी संबंधित आणखी काही जणांची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू आहे. २० मे रोजी या चौघांना अटक करण्यात आल्यानंतर मोदींना लक्ष्य बनविण्याचा कट उघडकीस आला. मोदींनी ऑक्टोबरमध्ये पाटण्यात रॅलीला संबोधित केले होते. या चौघांकडून मिळालेल्या माहितीनंतर शुक्रवारी रात्री इफ्तिकार आणि फिरोज असलम या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर झारखंडच्या सिथियो गावाजवळ १८ जिवंत बॉम्ब तसेच डिटोनेटर आणि स्फोटके हस्तगत करण्यात आली. (वृत्तसंस्था)