चॉकलेट विक्रेत्याकडे 18 कोटी, आयकरने विभागाने मागितला खुलासा
By Admin | Updated: June 4, 2017 21:57 IST2017-06-04T21:56:28+5:302017-06-04T21:57:34+5:30
चॉकलेट विक्रेता सी. किशोर लाल (३०) आयकर विभागाने याच्याकडे बँक खात्यातील व्यवहारांचा खुलासा मागितला आहे.

चॉकलेट विक्रेत्याकडे 18 कोटी, आयकरने विभागाने मागितला खुलासा
ऑनलाइन लोकमत
विजयवाडा, दि. 4 : चॉकलेट विक्रेता सी. किशोर लाल (३०) आयकर विभागाने याच्याकडे बँक खात्यातील व्यवहारांचा खुलासा मागितला आहे. लाल याने कोट्यवधी रुपये साठवून ठेवल्याचा आयकर विभागाचा संशय आहे. विजयवाडा येथे लाल चॉकलेट विकायचा. त्याला आयकर विभागाने २५ मे रोजी बजावलेल्या नोटिशीमध्ये बँक खात्यातील प्रचंड आर्थिक व्यवहारांचा खुलासा मागितला आहे. किशोर लाल दारोदार फिरून चॉकलेट विकतो. माल ठेवण्यासाठी त्याच्याकडे छोटीशी जागाही आहे. त्याचे रोजचे उत्पन्न त्याच्या बँक खात्यातील १८ कोटी १४ लाख ९८ हजार ८१५ रुपये बघितल्यावर क्षुल्लकच वाटावे. त्याने नुकतेच रेणुकामाता मल्टिस्टेट को-आॅपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये खाते उघडले. अहमदाबादेतील या बँकेने विजयवाड्यात नुकतीच शाखा सुरू केली. या बँकेत वन टाउन एरियातील शेकडो विक्रेत्यांनी खाते सुरू केले. गेल्या काही महिन्यांत किशोर लालच्या खात्यात मुंबईहून संशयास्पद रकमांचे (१८ कोटी रुपये) व्यवहार झाल्याचे आढळले. किशोर लालने आयकर विभागात जाऊन या माझ्या बँक खात्यातील व्यवहारांशी माझा काहीही संबंध नसल्याचे सांगितले. आयकर विभागाने यासंदर्भातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण बँकेकडे मागितले आहे. या संशयास्पद व्यवहारांत बँकेचाही सहभाग असल्याचा आयकर विभागाचा संशय आहे.