फक्त ३० टक्के मते घेऊन १७८ नेते बनले खासदार; निवडणूक आयाेगाची आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 09:49 IST2024-12-30T09:48:34+5:302024-12-30T09:49:14+5:30

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत ३० टक्के मते मिळवून १२५ नेते खासदार झाले होते. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये जवळपास ६६ टक्के मतदारांनी मतदान केले होते.

178 leaders became MPs with just 30 percent votes; Election Commission figures | फक्त ३० टक्के मते घेऊन १७८ नेते बनले खासदार; निवडणूक आयाेगाची आकडेवारी

फक्त ३० टक्के मते घेऊन १७८ नेते बनले खासदार; निवडणूक आयाेगाची आकडेवारी

नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ५४२ पैकी १७८ खासदार एकूण मतदारांच्या तुलनेत केवळ ३० टक्के मते मिळवून निवडून आले आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. 

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत ३० टक्के मते मिळवून १२५ नेते खासदार झाले होते. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये जवळपास ६६ टक्के मतदारांनी मतदान केले होते. पक्षनिहाय पाहायला गेले तर भाजपच्या २४० खासदारांपैकी ५७, काँग्रेसच्या ९९ खासदारांपैकी ३०, समाजवादी पक्षाच्या ३७ खासदारांपैकी ३१ खासदारांनी ३० टक्के किंवा त्यापेक्षा कमी मते मिळवून विजय मिळवला आहे. भाजपला २३.५९ कोटी, काँग्रेसला १३.६७ कोटी आणि समाजवादी पार्टीला २.९५ कोटी मते मिळाली आहेत.

विजयी उमेदवारांची संख्या 
३०% पर्यंत    ०५ 
३० ते ४०%    २८ 
४० ते ५०%    २३० 
५० ते ६०%    २१५ 
६० ते ७०%    ५७ 
७०%+    ०७

महाराष्ट्रात काय?
५४२ लोकसभा मतदारसंघातील आठ खासदार केवळ १० ते २० टक्के मते घेत निवडून आले आहेत. तर १७० उमेदवार २० ते ३० टक्के मते घेत निवडून आले. यासह २६६ खासदार ३० ते ४० टक्के मते मिळवून विजयी झाले.
तर ९२ खासदार ४० ते ५० टक्के मते मिळवून विजयी झाले आहेत. केवळ ६ खासदार ५० टक्क्यांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाले आहेत. ३० टक्के किंवा त्यापेक्षा कमी मतांनी जिंकलेल्या महाराष्ट्रातील २४ खासदार आहेत.
 

Web Title: 178 leaders became MPs with just 30 percent votes; Election Commission figures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.