शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

विकासात भारत सुस्साट, नागपूरही सुपरफास्ट... जगातील वेगाने विकसित होणाऱ्या टॉप-२० पैकी १७ शहरं भारतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 15:13 IST

येत्या काळामध्ये जगातील वेगाने विकसित होत असलेल्या शहरांमध्ये भारतातील शहराचे वर्चस्व दिसून येणार आहे.

ठळक मुद्देयेत्या काळामध्ये जगातील वेगाने विकसित होत असलेल्या शहरांमध्ये भारतातील शहराचे वर्चस्व दिसून येणार आहे.ग्लोबल इकॉनमिक रिसर्चमध्ये देण्यात आलेल्या  माहितीप्रमाणे जीडीपीच्या दृष्टीने जगातील वेगाने विकसित होत असेल्या 20 शहरांपैकी 17 शहरे भारतातील असणार आहेत

नवी दिल्ली -  येत्या काळामध्ये जगातील वेगाने विकसित होत असलेल्या शहरांमध्ये भारतातील शहराचे वर्चस्व दिसून येणार आहे. एका ग्लोबल इकॉनमिक रिसर्चमध्ये देण्यात आलेल्या  माहितीप्रमाणे जीडीपीच्या दृष्टीने जगातील वेगाने विकसित होत असेल्या 20 शहरांपैकी 17 शहरे भारतातील असणार आहेत. ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स नावाच्या एका संशोधन संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार भविष्यातील जीडीपी वाढीची तुलना केल्यास 2019 ते 2035 यादरम्यान, जगातील 20 वेगाने विकसित होत असलेल्या शहरांमध्ये भारतातील 17 शहरांचा समावेश असेल. यामध्ये बंगळुरू, हैदराबाद  आणि चेन्नईची कामगिरी चांगली असेल. या काळात वेगाने विकसित होणाऱ्या अव्वल दहा शहरांमध्ये सूरतने पहिले स्थान पटकावले आहे. त्यानंतर आग्रा आणि बंगळुरूचा क्रमांक लागला आहे. हैदराबाद या क्रमवारीत चौथ्या तर नागपूर पाचव्या स्थानी आहे. त्यानंतर तिरुपूर, राजकोट, तिरुचिरापल्ली, चेन्नई आणि विजयवाडा यांचा क्रमांक लागला आहे.  हिऱ्यांवरील प्रक्रिया आणि विक्रीचे केंद्र असल्याने तसेच आयटी सेक्टर विकसित झाल्याने सूरतला या क्रमवारीत पहिले स्थान मिळाले आहे.  बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई ही शहरे तंत्रज्ञान केंद्र आणि पतपुरवठा करणाऱ्या संस्थांसाठी ओळखली जातात. भारताबाहेर नोम पेन्ह हे 2019 ते 2035 दरम्यान जगातील सगळ्यात वेगाने विकसित होणारे शहर असेल. तर आफ्रिकेमधील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये दार अस सलाम अव्वलस्थानी असेल. लोकसंख्येचा विचार केल्यास 2035 मध्ये अव्वल दहा शहरांमध्ये मुंबई पहिल्या स्थानी असेल.  ऑक्सफर्ड ग्लोबल इकॉनमिक रिसर्चचे प्रमुख रिचर्ड हॉल्ट यांनी सांगितले की 2035 पर्यंत भारतीय शहरांचा एकत्रित जीडीपी हा चीन, उत्तर अमेरिका आणि युरोपमधील शहरांच्या तुलनेत कमीच असेल. मात्र असेल असले तरी प्रत्येक बाबतीत भारतीय शहरे आगेकूच करणार आहे.  

टॅग्स :IndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय