शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

Atiq Ahmed, Ashraf Shot Dead : अतीकच्या सुरक्षेत तैनात 17 पोलीस कर्मचारी निलंबित, CM योगींच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 01:53 IST

अतीक अहमद आणि अश्रफच्या हत्येनंतर, त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असलेल्या 17 पोलील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याच बरोबर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारी निवासस्थानाची सुरक्षाही वाढविण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांची शनिवारी रात्री तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली. येथील मेडिकल कॉलेजबाहेर हा संपूर्ण थरार घडला. विशेष म्हणजे, या दोघांना पोलीस बंदोबस्तात मेडिकलसाठी नेत असतानाच हा हल्ला झाला. यानंतर आता, अतीक अहमद आणि अश्रफच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात 17 पोलील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. 

17 पोलील कर्मचाऱ्यांना करण्यात आले निलंबित - अतीक अहमद आणि अश्रफच्या हत्येनंतर, त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असलेल्या 17 पोलील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याच बरोबर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारी निवासस्थानाची सुरक्षाही वाढविण्यात आली आहे. याशिवाय, अतिक आणि अश्रफच्या हत्येनंतर, प्रयागराजमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने कलम 144 लागू करण्यात आले आहे. याच बरोबर परिसरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

तीन जणांनी झाडल्या गोळ्या - प्रयागराजमधील मेडिकल कॉलेजबाहेर तीन जणांनी जय श्री राम, अशा घोषणा देत अतिक आणि त्याचा भाऊ अश्रफवर गोळ्या झाडल्या. यानंतर या तिघांनीही तत्काळ आत्मसमर्पणही केले आहे. यापूर्वी 13 एप्रिलला झांसी जिल्ह्यातील परीछा डॅम भागात अतीकचा मुलगा असद आणि मुहम्मद गुलाम यांचा पोलीस एनकाउंटरमध्ये मृत्यू झाला होता. आजच अतीक अहमदचा मुलगा असदचा पोलीस बंदोबस्तात कसारी-मसारी कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला होता. 

4 जणांचं एनकाउंटर, 3 जणांचा शोध सुरू -उमेश पाल हत्याकांडात पोलीस अतीक अहमदचा मुलगा असद, अरमान, गुलाम, गुड्डू मुस्लिम आणि साबिर यांच्या शोधात होते. यांच्यावर 5-5 लाख रुपयांचे बक्षिसही घोषित करण्यात आले होते. पोलिसांनी असद आणि गुलाम यांचे एनकाउंटर केले. तीन शूटर अरमान, गुड्डू मुस्लिम आणि साबिर यांचा शोध सुरू आहे. यापूर्वी पोलिसांनी दोन शूटर अरबाज आणि विजय चौधरी उर्फ उस्मान यांचे एनकाउंटर केले होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस