शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकच्या १७ आमदारांची अपात्रता वैध- सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 06:34 IST

बंडखोरी करून राजीनामा दिलेल्या काँग्रेस व जनता दल (यू)च्या १७ आमदारांना अपात्र घोषित करण्याचा विधानसभाध्यक्षांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी वैध ठरविला.

नवी दिल्ली : कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार पाडण्यासाठी बंडखोरी करून राजीनामा दिलेल्या काँग्रेस व जनता दल (यू)च्या १७ आमदारांना अपात्र घोषित करण्याचा विधानसभाध्यक्षांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी वैध ठरविला. मात्र, त्यांना विधानसभेची मुदत संपेपर्यंत निवडणूक लढविण्यास घातलेली बंदी बेकायदा ठरविली. त्यामुळे या आमदारांना ५ डिसेंबरला होणारी पोटनिवडणूक लढविता येईल.आधीचे विधानसभाध्यक्ष रमेशकुमार यांनी या आमदारांचे राजीनामे अमान्य करून त्यांना पक्षांतरबंदी कायद्यान्वये अपात्र घोषित केले होते. या दोन्ही निर्णयांच्या विरोधात आमदारांनी केलेल्या याचिकांवरील निकाल न्या. एन. व्ही. रमणा, न्या. संजीव खन्ना व न्या. कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने जाहीर केला. विधानसभाध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात दाद मागता येते, असा निर्वाळाही देतानाच, या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात येण्याआधी उच्च न्यायालयात दाद मागितली असती, तर ते संयुक्तिक झाले असते, असेही खंडपीठाने म्हटले.>काही महत्त्वाची निरीक्षणेसदस्याने दबाव वा प्रलोभनाशिवाय स्वत:च्या मर्जीने राजीनामा दिला आहे, हे दाखवून दिल्यावर तो राजीनामा मंजूर करण्याखेरीज अध्यक्षांपुढे पर्याय राहात नाही. राजीनामा स्वेच्छेने दिला आहे वा नाही याखेरीज अन्य कोणत्याही बाबी अध्यक्ष विचारात घेऊ शकत नाहीत.राजीनामा दिल्यावर त्या आमदाराविरुद्ध अपात्रतेची कारवाई पुढे चालविता येत नाही, असे म्हणता येणार नाही. राजीनामा दिला तरी ज्यामुळे अपात्रता लागू होऊ शकते, ते आधी घडलेले कारण त्यामुळे नाहीसे होत नाही.पक्षांतरबंदी कायद्यान्वये अपात्रतेचा निर्णय देताना अध्यक्ष त्या सदस्याला ठरावीक काळासाठी निवडणूक लढविण्यास बंदी करू शकत नाहीत. राज्यघटनेतील अधिकारांना बगल देऊन राजकीय गरज म्हणून विधानसभाध्यक्ष निवडणूकबंदीचा नसलेला अधिकार वापरू शकत नाहीत.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnatak Politicsकर्नाटक राजकारणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय