शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पगार मागितला म्हणून घरकाम करणाऱ्या मुलीची हत्या करून केले 3 तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 09:22 IST

तीन वर्षाआधी या मुलीला झारखंडहून दिल्लीला आणलं होतं.

नवी दिल्ली- पगार मागितला म्हणून घरकाम करणाऱ्या 16 वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यापेक्षा विकृत म्हणजे हत्येनंतर मुलीच्या मृतदेहाचे तीन तुकडे केले. तीन वर्षाआधी या मुलीला झारखंडहून दिल्लीला आणलं होतं. तिला पुन्हा झारखंडला परतायचं होतं म्हणूनच तिने पगार मागितला. म्हणून चिडलेल्या व्यक्तीने तिची बंद खोलीत तव्याने मारहाण करुन हत्या केली. हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे तीन तुकडे केले व ते बॅगेत भरून बॅग नाल्यात फेकली. मुलीच्या हत्येत एकुण चार जणांचा समावेश असून एका व्यक्तीला पोलिसांची अटक केली आहे. इतर तीन जण फरार आहेत. 

4 मे रोजी मियावाली नगर इथल्या नाल्यात मुलीचा मृतदेह आढळल्याने ही घटना समोर आली. तब्बल 16 दिवसाच्या तपासानंतर पोलिसांनी हे प्रकरण सोडवलं. मुलीची ओळख पटली असून पोलिसांनी 30 वर्षीय मंजीत करकेटाला अटक केली आहे. हा आरोपी रांचीचा रहिवासी आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, 16 वर्षीय मुलगी रांची जवळच्या माल्गोची राहणारी होती. घरी आई व दोन मोठे भाऊ असं तिचं कुटुंब आहे. घरामध्ये पैशांची अतिशय चणचण होती. म्हणून या मुलीला तीन वर्षाआधी राकेश नावाच्या व्यक्तीन नोकरीसाठी दिल्लीला आणलं. रांचीचा राहणार मंजीत करकेटा घरकाम करणाऱ्या महिला देण्याचं काम करतो. मंजीतबरोबर शाहू आणि गौरी हे दोघेही काम करतात. पीडित मुलीला आरोपी विविध जागी काम करायला पाठवायचे. महिन्याला 6500 रुपये पगात तिला ठरवला होता पण त्यांनी तिला एक पैसाही दिला नाही. मुलीने परत झारखंडला पाठविण्याची विनंती त्यांना केली पण त्या आरोपींनी ती धुडकावून लावली. मे महिन्याच्या सुरूवातीला एक दिवशी पीडित मुलीने राकेशकडे घरी पाठविण्यासाठी हट्ट केला. तीन वर्षांचा पगारही मागितला. त्यावेळी राकेशने तिला शाहू आणि मंजीतच्या ताब्यात दिलं. शाहू व मंजीतने तिला नांगलोईच्या भूतवाली गल्लीमधील एका इमारतीमधील चौथ्या मजल्यावर नेलं. तेथे तव्याने तिच्या डोक्यावर वार करत तिची हत्या केली व नंतर मृतदेहाचे तीन तुकडे केले. मृतदेहाचे तुकडे बॅगमध्ये भरून मियावली नगरमधील ज्वालापुरी जवळच्या नाल्यात फेकले. 

दरम्यान, 4 मे रोजी नाल्यात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन घटनेचा शोध लावला.  

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखूनDeathमृत्यूNew Delhiनवी दिल्ली