शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानच्या १६ मंत्र्यांना धमकीचे ई-मेल

By admin | Updated: December 27, 2014 05:00 IST

राजस्थान मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांना त्यांच्या सरकारी ई-मेल आयडीवर इंडियन मुजाहिदीनच्या नावाने कथित रूपाने धमकीचे ई-मेल्स आल्याची माहिती राजस्थान पोलिसांनी दिली

जयपूर : राजस्थान मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांना त्यांच्या सरकारी ई-मेल आयडीवर इंडियन मुजाहिदीनच्या नावाने कथित रूपाने धमकीचे ई-मेल्स आल्याची माहिती राजस्थान पोलिसांनी दिली आहे. या प्रकारामुळे राज्यातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. गृहमंत्री गुलाबचंद कटारिया व सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्री अरुण चतुर्वेदी यांच्यासह अन्य कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांना व राज्यमंत्र्यांना २२ डिसेंबर रोजी हे ई-मेल्स आले आहेत.अतिरिक्त पोलीस महासंचालक आलोक त्रिपाठी यांनी, राजस्थानातील १६ मंत्र्यांना असे धमकीवजा ई-मेल्स आल्यानंतर राज्यातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आल्याचे सांगितले. राजस्थानचे पोलीस महासंचालक ओमेंद्र भारद्वाज यांनी, या मेल्समध्ये, ‘तुम्हीच समजून जा, आम्ही काय करू शकतो ते,’ अशा आशयाची धमकी आहे असे सांगितले. याबाबत तातडीने काही सांगणे हे चुकीचे ठरणारे असून या ई-मेल्सचा तपास पोलीस करीत आहेत. त्या तपासानंतरच त्याबाबत काही सांगितले जाऊ शकते, असे त्यांनी पुढे म्हटले. या प्रकारामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. (वृत्तसंस्था)एकाच ठिकाणाहूनहे सर्व ई-मेल्स एकाच ई-मेल आयडीवरून या मंत्र्यांना पाठविले असून त्यातील भाषा बरीच अशुद्ध आहे व त्यात कोणालाही लक्ष्य बनविलेले दिसले नाही, अशीही माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक आलोक त्रिपाठी यांनी दिली.पोलीस महासंचालक सर्व माहिती घेत आहेत व हे ई-मेल पाठविणाऱ्यांचा लवकरच छडा लावला जाईल. राज्यात सुरक्षा व्यवस्थेचा पुरेपूर बंदोबस्त केला जात आहे.- गुलाबचंद कटारिया, गृहमंत्री, राजस्थानया ई-मेलमध्ये संभाव्य हल्ल्याचे लक्ष्य किंवा स्वरूप याविषयी काहीही उल्लेख नाही. ज्या ई-मेल आयडीवरून हे मेल आले आहेत त्याआधारे आम्ही माहिती गोळा करीत आहोत.- ओमेंद्र भारद्वाज, पोलीस महासंचालक, राजस्थान