१६ धरणे आंदोलन जोड

By Admin | Updated: December 16, 2014 23:44 IST2014-12-16T23:44:13+5:302014-12-16T23:44:13+5:30

नेतृत्व : संघटनेचे अध्यक्ष आर. यू. राठोड कार्यकर्ते : प्रा. महादेव डोंबाडे, प्रा. पुंडलिक गिरीपुंजे, प्रा. सी. के. शिंदे, प्रा. गोवर्धन, प्रा. प्रवीण वाबळे, प्रा. जयसिंग पाटील, प्रा. मुळे, प्रा. जमादार, प्रा. मोहसीन शेख, प्रा. पी. एस. राठोड आदी.

16 Dham movement movement | १६ धरणे आंदोलन जोड

१६ धरणे आंदोलन जोड

तृत्व : संघटनेचे अध्यक्ष आर. यू. राठोड कार्यकर्ते : प्रा. महादेव डोंबाडे, प्रा. पुंडलिक गिरीपुंजे, प्रा. सी. के. शिंदे, प्रा. गोवर्धन, प्रा. प्रवीण वाबळे, प्रा. जयसिंग पाटील, प्रा. मुळे, प्रा. जमादार, प्रा. मोहसीन शेख, प्रा. पी. एस. राठोड आदी.
महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटना
नागपूर : सहाव्या वेतन आयोगाच्या वेतन फरकाची थकबाकी देण्यात यावी, यासह इतर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटनेच्या वतीने हिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे आंदोलन करण्यात आले.
प्रमुख मागण्या : ७ ऑगस्ट २०१३ रोजीच्या आदेशानुसार दर तीन वर्षांनी होणारी त्रिपक्षीय कामगार कल्याण निधीची दरवाढ देण्यात यावी, शासनाकडून थकबाकीची रक्कम मिळावी, त्रिपक्षीय अंशदानाच्या हिश्श्यातील तरतुदीत वाढ करावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.
नेतृत्व : संघटनेचे अध्यक्ष आ. भाई जगताप नेतृत्व : दिलीप जगताप, अनंत जगताप, सुधर्मा खोडे, सचिन वंजारी, संजय वानोडे, धीरज वाडेकर आदी.
सार्वजनिक बांधकाम विभाग विरोधी कृती समिती
नागपूर : ठाणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागात झालेल्या घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव यांनी सार्वजनिक बांधकाम विरोधी कृतीअंतर्गत धरणे आंदोलनाला सुरुवात केली.
प्रमुख मागण्या : ठाण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ६१ लाख रुपयांचा साहित्य घोटाळा झाला. या घोटाळ्यास जबाबदार धरून कार्यकारी अभियंत्यावर कारवाई करावी, अडीच लाखाचे वीज देयक शासनाच्या खर्चातून भरले. ते त्या अधिकाऱ्याकडून वसूल करण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.
नेतृत्व : सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव कार्यकर्ते : श्याम राऊत, राजेश पराटे, विश्वनाथ जाधव आदी.

Web Title: 16 Dham movement movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.