देवळा मर्चंट बँकेच्या निवडणुकीसाठी १६ उमेदवार
By Admin | Updated: March 21, 2015 00:11 IST2015-03-20T22:40:01+5:302015-03-21T00:11:51+5:30
१४ जागा : दोन अपक्ष उमेदवार

देवळा मर्चंट बँकेच्या निवडणुकीसाठी १६ उमेदवार
१४ जागा : दोन अपक्ष उमेदवार
देवला : देवळा मर्चंट को-ऑप. बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे दिसत असतांनाच दोन उमेदवारांनी अपक्ष निवडणुक लढविण्याचा निर्णय अर्ज माघारीच्या अखेरच्यादिवशी घेतल्याने आता १४ जागांसाठी १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २९ मार्च रोजी ही निवडणुक होत आहे.
१७ जागांसाठी होणार्या ा पंचवार्षिक निवडणुकीत इतर मागासवर्ग गटात इतर उमेदवारांनी माघार घेतल्याने भारत बिपीनचंद्र कोठावदे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची ा गटातून बिनविरोध निवड झाली. भटक्या जमाती गटात किसन दगाजी मोरे व अनुसुचित जाती गटात गणेश मल्हारी सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली. महिला गटात दोन जागांसाठी तीन उमेदवार व सर्वसाधारण गटात १२ जागांसाठी १३ उमेदवार अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर राहील्याने या दोन्ही गटात निवडणुक होत आहे.
बँकेच विद्यमान अध्यक्ष भालचंद्र विनायक कोठावदे यांच्या नेतृत्वाखाली भाग्योदय पॅनलची निर्मिती करण्यात आली असून विमान हे पॅनलचे निवडणुक चिन्ह अहे. भाग्योदय पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे महिला राखीव गट - मनीषा शिनकर, अरुणा बागडे
सर्वसाधारण गट - गोविंद मितकर, राजेंद्र सुर्यवंशी, राजेंद्र वडनेरे, दत्तात्रेय मेतकर, मेघनाथ शेवाळकर, अनिल धामणे, यशवंत शिरोरे, सुकलाल गेल्डा, प्रकाश गहीडे, प्रशांत निकम, किसनराव, जयप्रकाश कोठावदे, राजेंद्र मेतकर
महिला राखीव गटात नलिनी मेतकर व सर्वसाधारण गटात दगडू महाजन हे छत्री निवडणुकचिन्ह घेउन अपक्ष निवडणुक लढवित आहे.