शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

देशभर आयएसशी संबंधित १५५ जणांना अटक -रेड्डी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 04:28 IST

बंदी घालण्यात आलेल्या इस्लामिक स्टेटचे (आयएस) सदस्य आणि सहानुभूतीदार अशा १५५ जणांना देशभरात अटक करण्यात आली आहे, असे गृहमंत्रालयाने मंगळवारी लोकसभेत सांगितले.

नवी दिल्ली : बंदी घालण्यात आलेल्या इस्लामिक स्टेटचे (आयएस) सदस्य आणि सहानुभूतीदार अशा १५५ जणांना देशभरात अटक करण्यात आली आहे, असे गृहमंत्रालयाने मंगळवारी लोकसभेत सांगितले. वेगवेगळ्या राज्यांत काही लोक स्वतंत्रपणे आयएसला जाऊन मिळाल्याच्याही घटना केंद्रीय आणि राज्याच्या सुरक्षा संस्थांच्या निदर्शनास आल्या आहेत, असे मंत्रालयाने म्हटले.एनआयए आणि राज्याचे पोलीस दल यांनी आयएसचे सहानुभूतीदार आणि सदस्यांवर गुन्हेही दाखल केले आहेत आणि संपूर्ण देशभरातून १५५ जणांना अटक केली, असे गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले. इस्लामिक स्टेट, इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड लेव्हँट, इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरिया किंवा दाएश यांना त्या दहशतवादी संघटना असल्याचे अधिसूचित करण्यात येऊन बेकायदा कारवाया (प्रतिबंध) कायदा, १९६७ च्या पहिल्या अनुसूचीनुसार केंद्र सरकारने जाहीर केलेले आहे.समाजमाध्यमांचा वापरआयएस आपल्या विचारधारेचा प्रसार करण्यासाठी इंटरनेट आधारित वेगवेगळ्या समाजमाध्यमांचा उपयोग करीत आहे. या पार्श्वभूमीवर या सुरक्षा संस्था सायबर स्पेसवर अतिशय कडक नजर ठेवून असतात व जी कारवाई केली गेली ती कायद्यानुसारच होती, असे रेड्डी म्हणाले. 

टॅग्स :ISISइसिसTerrorismदहशतवादIndiaभारत