शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

गुजरात निवडणुकीत 154 नरेंद्र मोदी करणार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2017 3:49 PM

गुजरात निवडणुकीत 154 नरेंद्र मोदी मतदान करणार आहेत. गुजरात निवडणुकीसाठी मतदान करणा-या 154 मतदारांचं नाव नरेंद्र मोदी आहे. या 154 नावांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश आहे.

ठळक मुद्देयावेळी गुजरात निवडणुकीत 154 नरेंद्र मोदी मतदान करणार आहेतगुजरात निवडणुकीसाठी मतदान करणा-या 154 मतदारांचं नाव नरेंद्र मोदी आहेया 154 नावांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश आहे

अहमदाबाद - नावात काय आहे? असा सवाल शेक्सपिअरने विचारला होता. पण पुढील दिवसांमध्ये नाव हे एक ब्रॅण्ड होईल याची कल्पना कदाचित शेक्सपिअरला नव्हती. भाजपाने अनेकदा निवडणुकीत मोदी ब्रॅण्डचा वापर केला असून, त्याचा निकालही समोर आला आहे. यावेळी गुजरात निवडणुकीतदेखील असंच काहीसं चित्र दिसणार आहे. यावेळी गुजरात निवडणुकीत 154 नरेंद्र मोदी मतदान करणार आहेत. गुजरात निवडणुकीसाठी मतदान करणा-या 154 मतदारांचं नाव नरेंद्र मोदी आहे. या 154 नावांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश आहे.

गुजरात निवडणुकीत यावेळी पंतप्रधान मोदींच्या डुप्लिकेटची मागणीही जोरात आहे. सोबतच ज्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे, ते लोकदेखील आम्हाला अभिमान असल्याचं सांगत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एकूण 154 नरेंद्र मोदी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एक वेळ होती जेव्हा राजकीय पक्ष मतदारांचा गोंधळ करण्यासाठी रणनीतीचा भाग म्हणून एकाच नावाचे उमेदावर उभे करत असत. पण आता तर मतदारांचं नाव सारखं असल्याने गोंधळ उडालेला दिसत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव अहमदाबाद जिल्ह्याच्या मतदार यादीत आहे. याच यादीत नरेंद्र मोदी नाव सर्वात जास्त वेळा आहे. अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एकूण 49 नरेंद्र मोदींचं नाव मतदारांच्या यादीत आहे. यादीत मेहसाना दुस-या क्रमांकाचा जिल्हा आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, तेथील मतदार यादीत नरेंद्र मोदी नावाचे 24 मतदार आहेत. भरुच जिल्हा यामध्ये तिस-या क्रमांकावर असून,  सुरत चौथ्या क्रमांकावर आहे. भरुचमध्ये 16 तर सुरतमध्ये 15 नरेंद्र मोदी मतदान करणार आहेत. 

उत्तर गुजरातमधील पाटन आणि मेहसाना जिल्ह्यातदेखील नरेंद्र मोदी नावाचे मतदार आहेत. पाटन येथे 13 तर बनसकंठा येथे 11 मतदार आहेत. तर दुसरीकडे सबरकंठा, गांधीनगर और बडोदा येथे अनुक्रमे 7,6,6 मतदार आहेत. 

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली आहे. राज्यात दोन टप्प्यांत मतदान केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 9 डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात 14 डिसेंबरला मतदान होणार आहे. गुजरातचा निकाल हिमाचल प्रदेशसोबत १८ डिसेंबर रोजी लागणार आहे. आदर्श निवडणूक आचारसंहिता गुजरातबरोबर केंद्र सरकारलाही लागू झाली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Gujaratगुजरात