आल्तिनोवरील बांधकाम खात्याच्या कार्यालयावर 150 कर्मचार्यांचा मोर्चा
By Admin | Updated: August 12, 2015 00:35 IST2015-08-12T00:35:57+5:302015-08-12T00:35:57+5:30
पणजी : पगारवाढ आणि सेवेत कायम रुजू करण्याची मागणी करत मंगळवारी बांधकाम खात्याच्या कामगारांनी बांधकाम खात्याच्या आल्तिनो येथील मुख्यालयावर मोर्चा काढला. आयटकचे नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांच्या नेतृत्वाखाली 150 कामगार या मोर्चात सहभागी झाले होते.

आल्तिनोवरील बांधकाम खात्याच्या कार्यालयावर 150 कर्मचार्यांचा मोर्चा
प जी : पगारवाढ आणि सेवेत कायम रुजू करण्याची मागणी करत मंगळवारी बांधकाम खात्याच्या कामगारांनी बांधकाम खात्याच्या आल्तिनो येथील मुख्यालयावर मोर्चा काढला. आयटकचे नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांच्या नेतृत्वाखाली 150 कामगार या मोर्चात सहभागी झाले होते.समाज बांधकमाक खात्याच्या कर्मचार्यांच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबीत ठेवण्यात आलेल्या आहेत. या मागण्या त्वरीत मान्य कराव्यात अशी मागणी कर्मचार्यांडून करण्यात आलेली आहे. कर्मचार्यांचे म्हणणे आहे की जे कर्मचारी गेली आठ वर्षे सातत्याने विविध विभागात काम क रत आहे त्यांना कायम करण्याची मागणी करण्यात आली आहे. तत्काळ तत्वावर काम करणार्या कर्मचार्यांचे पद आणि वेतन यासंबंधी दुरुस्ती करुन वेतन वेळवेर देण्यात यावे. आठ वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचारयांना नोकरीत कायम करण्यासाठी 13 जुलै 2015 रोजी खात्याला नोटीस देण्यात आली होती. कर्मचारी वर्गाची यादी देखील उपलब्ध करण्यात आली होती मात्र अद्याप कर्मचार्यांना कायमस्वरुपी करण्यात आलेले नाही असे कर्मचार्यांचे म्हणणे आहे. कर्मचारयांची कॅजुअल सु?ी संपल्यानंतर त्यांना प्रीवीलेज लिव्हची सुविधा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कर्मचार्यांना सहा महिन्यांची मॅटरनीटी सु?ी देणे आवश्यक असल्याचे कर्मचारी वर्गाचे मत आहे. जे कर्मचारी गेली एक वर्षे कंत्रात पध्दतीवर काम करत आहेत, अशा कामगारांना रोल पे द्यावा आणि समान कामासाठी समान वेतन पध्दती लागू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. कर्मचार्यांना मिळणार्या वेतनाची पावती वेळेवर देणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)