15 year old girl pregnant gang rape abortion | धक्कादायक! 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 3 तरुणांचा आळीपाळीनं सामूहिक बलात्कार 
धक्कादायक! 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 3 तरुणांचा आळीपाळीनं सामूहिक बलात्कार 

लखनऊः उत्तर प्रदेशमध्ये एका 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. या सामूहिक बलात्कारानंतर ती मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर आरोपींनी तिचा गर्भपात केला आहे. उत्तर प्रदेशमधल्या महोबा जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार समजल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार नोंदवली असून, आरोपींवर कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोलिसांनीही या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून गुन्हा नोंदवून घेतला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींचा शोध सुरू केला आहे. पीडितेच्या जबाबानुसार, सामूहिक बलात्काराच्या घटनेसंदर्भात कुठेही वाच्यता केल्या तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. पीडितेच्या कुटुंबीयांनाही ते आरोपी धमकावत होते. पीडित आणि तिच्या कुटुंबीयांनी न्यायाची अपेक्षा केली आहे. पीडितेची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर पोलीस पुढची कारवाई करणार आहेत. 


Web Title: 15 year old girl pregnant gang rape abortion
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.