१५... छायांकित.... कामठी

By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:44+5:302015-06-15T21:29:44+5:30

(फोटो)

15 ... shaded .... Kamathi | १५... छायांकित.... कामठी

१५... छायांकित.... कामठी

(फ
ोटो)
छोटी अजनीचे पुनवर्सन करा!
कामठी : छोटी अजनीचे सरकारी जागेवर पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी भारतीय भोई विकास मंडळाने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. कॅन्टोनमेंट एरिया बोर्ड होण्यापूर्वी कामठी तालुक्यात छोटी अजनी, कालीपलटन, गोराबाजार, कमसरी बाजार, उंटखाना, नयागोदाम आदी वसाहती होत्या. बोर्डाच्या निर्मितीनंतर येथील रहिवासी नागरिकांच्या जमिनी हिरावून घेण्यात आल्या. त्यांना कुठल्याही प्रकारचे हक्क देण्यात आले नाहीत. छोटी अजनी येथे बहुतांश गरीब नागरिक वास्तव्याला आहेत. त्यांच्याकडे उपजीविकेचे कुठलेही परंपरागत साधन नाही. त्यामुळे या वसाहतीचे सरकारी जागेवर पुनर्वसन करण्यात यावे, तिथे या नागरिकांना घरे बांधून देण्यात यावे, पुनर्वसन स्थळाच्या परिसरात रोजगारची साधने असावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे. शिष्टमंडळात दिलीप मेश्राम, हरिदास ठाकरे, मंगला देवगडे, अशोक भोयर, रामू टोहणे, कांता मेश्राम, कल्पना बावणे, सुमन सहारे, सुशीला केवट, मंजुळा खंडाते, नम्रता डोंगरे, माया डोंगरे, शोभा शिंदे, प्रभा शिंदे यांच्यासह अन्य नागरिकांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)
***

Web Title: 15 ... shaded .... Kamathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.