शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

तीन वर्षांत शहरांत बांधली १५ टक्के घरे; गृहनिर्माण खात्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 12:24 AM

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरी भागांमध्ये ५४ लाख ९५ हजार घरे बांधण्याचे जे उद्दिष्ट राखण्यात आले आहे, त्यातील १५ टक्के घरे गेल्या तीन वर्षांत बांधून पूर्ण झाली, असा दावा केंद्रीय नागरी व्यवहार आणि गृहनिर्माण खात्याने केला आहे.

नवी दिल्ली : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरी भागांमध्ये ५४ लाख ९५ हजार घरे बांधण्याचे जे उद्दिष्ट राखण्यात आले आहे, त्यातील १५ टक्के घरे गेल्या तीन वर्षांत बांधून पूर्ण झाली, असा दावा केंद्रीय नागरी व्यवहार आणि गृहनिर्माण खात्याने केला आहे.या खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत २०१५ ते २०२२ या कालावधीत देशभरात १ कोटी घरे बांधण्याचे ठरविले आहे. त्या दिशेने वेगात काम सुरू आहे.या योजनेखाली गेल्या महिन्यात शहरी भागांमध्ये १ लाख १२ हजार घरे बांधण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे केंद्रातर्फे बांधकामासाठी आर्थिक मदत दिली जाणाऱ्या अशा घरांची संख्या ५४ लाख ९५ हजार ४४३ इतकी झाली आहे. नगर आणि गृहनिर्माण खात्याचे प्रवक्ते राजीव जैन म्हणाले की, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ही घरे लवकरात लवकर बांधून कशी पूर्ण करता येतील, यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.या योजनेत ४३२० शहरे, छोटी शहरे यांचा समावेश करण्यात आला असून यंदा जुलै अखेरपर्यंत ११,२२६ गृहनिर्माण प्रकल्प मंजूर करण्यात आले. ज्या नागरिकाचे देशातील कोणत्याही भागात स्वत:च्या नावावर पक्के घर नाही, अशा कोणालाही या योजनेत सहभागी होता येईल.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला तेव्हापासून ते यंदा २१ आॅगस्टपर्यंत शहरी भागात ८.५५ लाख घरे बांधून पूर्ण झाली आहेत. देशभरात ३०.४ लाख घरांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे या सरकारच्या दाव्यावर टीका काँग्रेसचे प्रवक्ते आर. पी. एन. सिंग यांनी टीका केली. ते म्हणाले की, या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत पूर्ण झालेले काम हे नगण्य आहे; पण त्याचेही भांडवल करणे हा भाजपचा नवीन जुमला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी