शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
2
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
3
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
4
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
5
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
6
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
7
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
8
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
9
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
10
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
11
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
13
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
14
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
15
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
16
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
17
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
18
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
19
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
20
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा

आंध्र प्रदेशात बस अपघातात १५ ठार

By admin | Updated: January 7, 2015 23:57 IST

आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातून बुधवारी डोंगराळ भागातून जाणारी एक बस खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात १५ प्रवासी ठार तर ३० जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

हैदराबाद : आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातून बुधवारी डोंगराळ भागातून जाणारी एक बस खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात १५ प्रवासी ठार तर ३० जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांत नऊ महाविद्यालयीन तरुण, एक तरुणी व अन्य प्रवासी आहेत. पेनुकोंडाचे पोलीस उपाधीक्षक एन. सुब्बाराव यांनी जखमींना बेंगळुरू,अनंतपूर, पेनुकोंडा येथील रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले. हा अपघात बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास मदकसीरा व पेनुकोंडा दरम्यानच्या घाटात झाला. या ठिकाणी रस्त्याचे सपाटीकरण करण्याचे काम सुरू होते त्यासाठी रस्त्याला लागून एक लांब मार्ग खणण्यात आला होता. आंध्र प्रदेशचे गृहमंत्री एन. चिन्ना राजप्पा यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. (वृत्तसंस्था) राज्य सरकारने मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची सानुग्रह रक्कम देण्याची घोषणा केली आहे. आंध्रचे मुख्यमंत्री ए. चंद्राबाबू नायडू यांनीही या अपघाताविषयी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. आंध्र प्रदेश राज्य परिवहन मंडळाच्या या बसमधून ५० जण प्रवास करीत होते. बसचालकाने एका आॅटोरिक्षाला ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याने हा अपघात घडल्याचे अनंतपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक एस.व्ही. राजशेखर बाबू यांनी सांगितले. पंतप्रधानांना दु:खनवी दिल्ली-आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्णात झालेल्या रस्ते अपघाताची माहिती कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात ठार झालेल्या व्यक्तींकरिता दु:ख व त्यांच्या कुटुंबीयांविषयी सहानुभूती व्यक्त केली. या अपघातात ठार झालेल्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.