१५ विधेयके होणार मंजूर

By Admin | Updated: July 12, 2015 21:58 IST2015-07-12T21:58:10+5:302015-07-12T21:58:10+5:30

अधिवेशनात मांडणार १५ विधेयके

15 bills will be approved | १५ विधेयके होणार मंजूर

१५ विधेयके होणार मंजूर

िवेशनात मांडणार १५ विधेयके
मुंबई-विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात १५ विधेयके मांडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
अधिवेशनाला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कामकाजाची माहिती दिली. ते म्हणाले, विरोधकांनी कामकाजात अडथळे आणू नयेत, कारण महत्वाची अशी १५ विधेयके मांडण्यात येणार आहेत. आम्ही कोणत्याही मुद्यांवर सकारात्मक चर्चा करण्यास तयार आहोत.
अधिवेशनात मांडण्यात येणारी विधेयके अशी-मासेमारी गलबतांना अनुज्ञप्ती देणारे सागरी मासेमारी विधेयक, खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांमधील फी आकारणी व प्रवेश याचे नियमन करणारे विधेयक, जिल्हा परिषदेतील अध्यक्ष व सभापती यांच्या निवडणुका लढवताना जात प्रमाणपत्र सादर करण्याच्या अटीतून सूट देणारे विधेयक, नागरिकांना विशिष्ट कालावधीत सेवा देण्याबाबतचे विधेयक, अनधिकृतपणे गौण खनिज काढण्यावर निर्बंध आणण्याबाबचे विधेयक, बाजार समित्यांवर तज्ज्ञांची नियुक्ती करण्याबाबतचे विधेयक, व्यवसाय करण्यात सुलभता आणण्याकरिता काही सवलती देण्यासंबंधीचे विधेयक, ५०० चौ.फू. क्षेत्रफळ असणार्‍या लहान गाळे किंवा इमारती यांच्या मालमत्ता कराचा आकार पुढील पाच वर्षे कायम ठेवण्याबाबतचे विधेयक, महिला कामगारांना सुरक्षित व सुखकर काम करण्याकरिता काही सवलती देण्यासंबंधीचे विधेयक, महाराष्ट्र झोपडप˜ीदादा, हातभ˜ीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, डिव्हीओ पायरेटस यांच्यावर कारवाई करणार्‍या विधेयकाची व्याप्ती वाढवून वाळू माफियांवर जरब बसवण्याबाबतचे विधेयक व विनियोजन विधेयक अशी प्रमुख विधेयके मंजूर केली जाणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: 15 bills will be approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.