दुधाच्या दरात 14.50 टक्के वाढ
By Admin | Updated: August 6, 2014 02:21 IST2014-08-06T02:21:40+5:302014-08-06T02:21:40+5:30
गेल्या एक वर्षात देशामध्ये दुधाचे दर 14.5क् टक्क्यांनी वाढल्याची माहिती मंगळवारी सरकारने लोकसभेत दिली. विजयसिंह मोहिते पाटील आणि अन्य एका सदस्याने लोकसभेत याबाबत प्रश्न विचारला होता.

दुधाच्या दरात 14.50 टक्के वाढ
नवी दिल्ली : गेल्या एक वर्षात देशामध्ये दुधाचे दर 14.50 टक्क्यांनी वाढल्याची माहिती मंगळवारी सरकारने लोकसभेत दिली. विजयसिंह मोहिते पाटील आणि अन्य एका सदस्याने लोकसभेत याबाबत प्रश्न विचारला होता.
कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांनी सांगितले की, सहकारी आणि खासगी दूध संघांमार्फत वर्षभरात साधारणत: दोन-तीन वेळा यामध्ये बदल केले जातात. गेल्या मेमध्ये यात शेवटची वाढ करण्यात आली होती.
दरवाढीमुळे मे 2क्13 ते मे 2क्14 यादरम्यान दुधाच्या सरासरी खरेदी मूल्यात 17.68 टक्क्यांनी वाढ नोंदली, तर ग्राहकांसाठी दुधाच्या भावात 14.5क् टक्क्यांनी वाढ झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)