देशात दोन वर्षांत पत्रकारांवर हल्ल्यांचे १४२ प्रकार
By Admin | Updated: April 12, 2017 00:48 IST2017-04-12T00:48:49+5:302017-04-12T00:48:49+5:30
देशातील वेगवेगळ््या भागांत २०१४-२०१५ या वर्षांत पत्रकारांवर हल्ल्याचे १४२ प्रकार घडले, अशी माहिती लोकसभेत मंगळवारी प्रश्नोत्तर तासात देण्यात आली.

देशात दोन वर्षांत पत्रकारांवर हल्ल्यांचे १४२ प्रकार
नवी दिल्ली : देशातील वेगवेगळ््या भागांत २०१४-२०१५ या वर्षांत पत्रकारांवर हल्ल्याचे १४२ प्रकार घडले, अशी माहिती लोकसभेत मंगळवारी प्रश्नोत्तर तासात देण्यात आली. गृहराज्य मंत्री हंसराज अहिर म्हणाले की,‘‘२०१४ मध्ये पत्रकारांवर ११४ हल्ले झाले व त्यात ३२ जणांना अटक झाली. २०१५ मध्ये हल्ल्याचे २८ प्रकार घडले तर ४१ जणांना अटक झाली. पत्रकारांसह नागरिकांच्या संरक्षणासाठी सध्याचे कायदे पुरेसे आहेत.’’ प्रेस कॉन्सिल आॅफ इंडिया पीडित व्यक्तिंकडून निश्चित स्वरुपाची तक्रार आल्यास तत्काळ कारवाई करते. पत्रकारांसह खासगी व्यक्तिंकडून किंवा व्यक्तिंसाठी संरक्षण मागितले जाते. अशा सगळ््या मागण्यांचा अभ्यास केला जातो. धमकीचे स्वरुप पाहून आवश्यक ती कारवाई केली जाते, असे अहिर म्हणाले. पोलिस आणि सार्वजनिक व्यवस्थेची जबाबदारी राज्यांची असल्यामुळे पत्रकारांना संरक्षण द्यायची जबाबदारी राज्यांचीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हल्ला झाल्यास पत्रकार किंवा त्याच्या कुटुंबाला राज्य किंवा केंद्र सरकारकडून नुकसान भरपाई द्यायची तरतूद नाही, असेही ते म्हणाले.