शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

14 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, जातपंचायतीनं करून दिला बाल विवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2018 4:39 PM

बरेलीत एका 14 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

उत्तर प्रदेश- बरेलीत एका 14 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे सामूहिक बलात्कार झालेल्या या अल्पवयीन मुलीचा जातपंचायतीनं बाल विवाह लावून दिल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांवरही गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.जातपंचायतीनं या बलात्कार पीडित मुलीचा विवाह तिस-याच एका निरपराध मुलाशी करून दिला असून, बलात्कार करणारे आरोपी त्या पीडितेला ठार मारण्याची धमकी देत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून, अद्याप कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. बरेलीतल्या शाही ठाणे परिसरात हा प्रकार घडला आहे.एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या गावातल्याच तीन नराधमांनी बलात्कार केला. त्यानंतर ते नराधम बलात्कार पीडित मुलीला ठार मारण्याची धमकी देऊ लागले. जातपंचायतीकडे हे प्रकरण गेल्यानंतर त्यांनी पंचायत बोलावून अन्य एका निरपराध अल्पवयीन मुलाशी त्या पीडितेचं लग्न लावून दिलं. सामूहिक बलात्कार करूनही त्या नराधमांनी बलात्कार पीडितेशी लग्न केलेल्या निरपराध मुलालाही त्रास देण्यास सुरुवात केली. पोलिसांशी साटेलोटं करून त्या निरपराध मुलाला पोलीस ठाण्यात डांबून ठेवलं. त्यानंतर आता या प्रकरणात पोलिसांनी 5 जणांविरोधात एफआयआर दाखल करून घेतलं आहे. परंतु अद्यापही त्या नराधम आरोपींवर कारवाई करण्यात आलेली नाही.  

टॅग्स :MolestationविनयभंगUttar Pradeshउत्तर प्रदेश