शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक: नववीतील विद्यार्थीनीनं बाळाला जन्म दिला; गर्भवती असल्याची माहिती नव्हती, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 12:41 IST

कर्नाटकातील शासकीय निवासी शाळेतील इयत्ता नववीच्या विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिला आहे.

कर्नाटकातील शासकीय निवासी शाळेतील इयत्ता नववीच्या विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिला आहे. अवघ्या १४ व्या वर्षी तरूणी आई बनल्याने एकच खळबळ माजली. विशेष बाब म्हणजे ती गरोदर असल्याची माहिती देखील कोणाला नव्हती. पोटात वेदना होऊ लागल्याने डॉक्टरांकडे नेली असता ती आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. कर्नाटकातील चिक्कबल्लापुरा येथील ही घटना आहे. संबंधित तरूणीने एका मुलाला जन्म दिला असून पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ वर्षीय विद्यार्थिनी शासकीय शाळेच्या वसतिगृहात राहत होती. ती जेव्हा तिच्या घरी गेली तेव्हा तिने पोटदुखीची तक्रार केली तेव्हा ही घटना उघडकीस आली. तिचे पालक तिला रुग्णालयात घेऊन गेले जेथे स्कॅन केल्यानंतर डॉक्टरांना ती गर्भवती असल्याचे आढळले. 

गुन्हा दाखलएका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी ९ जानेवारीला तिची प्रसूती केली. मुलीचे वजन कमी असले तरी तिची आणि बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. अल्पवयीन मुलीची प्रसूती झाल्यानंतर रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

चौकशीदरम्यान विद्यार्थिनीने बाल कल्याण समितीला सांगितले की, तिच्या शाळेतील एका विद्यार्थ्याने तिला गर्भवती केले होते. पण नंतर तिने उघडपणे बोलणे टाळले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पण अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. विद्यार्थी आणि तिचे पालक उघडपणे बोलण्यास नकार देत आहेत. 

पीडित तरूणी तिच्या विधानावर ठाम नाही. तिने दुसऱ्या एका मुलाचे नावही सांगितले, जो तिच्या शाळेतील आहे. त्यामुळे जबाबदार कोण हे शोधण्यासाठी आम्ही या सर्वांची चौकशी करत आहोत. तुमाकुरू जिल्हा प्रशासनाने वसतिगृहाच्या वॉर्डनला निलंबित केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकCrime Newsगुन्हेगारीPOCSO Actपॉक्सो कायदाsex crimeसेक्स गुन्हा