शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सिगारेटमुळे दरवर्षी १३.५ लाख भारतीयांचा मृत्यू; निकोटीनला पर्याय शोधण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 10:12 IST

देशात तंबाखूमुळे होणाऱ्या आजारावर केंद्र सरकारला प्रत्येक वर्षी सरासरी १.७७ लाख कोटी रुपये खर्च करावा लागत आहे.

नवी दिल्ली : भारतात धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनामुळे प्रत्येक वर्षी १३.५ लाख नागरिकांचा मृत्यू होतो. वाढत्या धूम्रपानाला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात असतानादेखील धूम्रपान सोडण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. यावर उपाय म्हणून निकोटीनला पर्याय शोधण्याचा सल्ला आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला.

देशात तंबाखूमुळे होणाऱ्या आजारावर केंद्र सरकारला प्रत्येक वर्षी सरासरी १.७७ लाख कोटी रुपये खर्च करावा लागत आहे.

निकोटीनच्या गोळ्यांचा धोका कमी

रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन (ब्रिटन) यांनी केलेल्या वैज्ञानिक अभ्यासात ज्वलनशील नसलेले निकोटीन किंवा निकोटीनच्या गोळ्या या धूम्रपानापेक्षा लक्षणीयरीत्या कमी धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संशोधनकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे दिल्लीतील बीएलके-मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील पल्मोनरी मेडिसिनचे वरिष्ठ सल्लागार डॉ. पवन गुप्ता यांनी नमूद केले आहे.

धूरविरहित निकोटीन पर्याय

सिगारेट किंवा इतर ज्वलनशील निकोटीन हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. याला पर्याय म्हणून धूरविरहित निकोटीनचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळे हा उपाय धूम्रपानापेक्षा

९५ टक्के कमी हानिकारक असल्याचा दावा ‘पब्लिक हेल्थ इंग्लंड’ नामक संस्थेने केला आहे.

३४ देशांमध्ये निकोटीन पाउच सिगारेटला पर्याय

जागतिक पातळीवर सिगारेटला पर्याय म्हणून निकोटीन पाउच लोकप्रिय होत आहे. स्वीडन, नॉर्वे, अमेरिका व डेन्मार्कसह जगभरातील ३४ देशांमध्ये  सिगारेटला पर्याय म्हणून याचा वापर केला जात आहे.

भारतात धूम्रपान सोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पारंपरिक पद्धतीने मर्यादित यश मिळते.  त्यामुळे सुरक्षित, तंबाखूमुक्त निकोटीन पर्याय योग्यपणे नियंत्रित केले तर, सिगारेट सोडण्यास मदत होऊ शकते, असे मत एम्समधील डॉ. सुनैना सोनी यांनी व्यक्त केले.