शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅनची पॅसेंजरला धडक, उत्तर प्रदेशातील भीषण अपघातात 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 08:44 IST

विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनला झालेल्या भीषण अपघातात 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. सदर व्हॅन रेल्वे फाटक क्रॉस करत असताना ट्रॅकवरून भरधाव वेगात येत असलेल्या पँसेंजरची धडक बसून हा अपघात झाला.

लखनौ - उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनला झालेल्या भीषण अपघातात 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, तर 7  विद्यार्थी जखमी झाले आहेत. सदर व्हॅन रेल्वे फाटक क्रॉस करत असताना ट्रॅकवरून भरधाव वेगात येत असलेल्या पँसेंजरची धडक बसून हा अपघात झाला. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करून अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.  गुरुवारी सकाळीच तयारी करून शाळेला निघालेल्या विद्यार्थ्यांवर शाळेच्या वाटेवर असतानाच काळाने घाला घातला. डिव्हाइन पब्लिक स्कूलची टाटा मॅजिक गाडी सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत निघाली होती. ही व्हॅन दुदही रेल्वे फाटकावर आली असतानाच ट्रॅकवरून थावे-बढनी पँसेंजर येत होती. त्याचवेळी व्हॅनच्या चालकाने ट्रँक ओलांडण्याचा प्रयत्न केल्याने पॅसेंजरची धडक व्हॅनला बसली. या धडकेने व्हॅनचा चेंदामेंदा झाला. तर व्हॅनमधून प्रवास करणाऱ्या 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तसेच व्हॅन चालकाचाही या अपघातात मृत्यू झाला. अपघाताचा आवाज आणि मुलांचा आक्रोष ऐकल्यानंतर जवळपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. दरम्यान, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करून अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या चौकशीसाठी एका तपास समितीची स्थापना करण्यात आली आहे.  

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेशnewsबातम्या