मुर्शिदाबात हिंसाचारात हल्ला झालेले १३ जण झारखंडला पळून गेले; मारहाणीची दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 13:23 IST2025-04-15T13:04:24+5:302025-04-15T13:23:08+5:30
मुर्शिदाबाद हिंसाचारानंतर, गोविंद दास यांच्या कुटुंबातील १३ सदस्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी झारखंडला पळून गेले.

मुर्शिदाबात हिंसाचारात हल्ला झालेले १३ जण झारखंडला पळून गेले; मारहाणीची दिली माहिती
वक्फ कायद्याच्या निषेधार्थ पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये उसळलेल्या हिंसाचाराने अनेक कुटुंबांवर संकट ओढवले. या हिंसाचारात अनेकांवर हल्ले झाले आहेत. यात गोविंद दास आणि त्यांचा मुलगा चंदन दास यांच्या कुटुंबियांनी झारखंडमध्ये आश्रय घेतला आहे.
भारतासोबतच्या मैत्रीला ७८ वर्ष पूर्ण होताच रशियानं केली मोठी मागणी; चीनला मान्य होणार?
मुर्शिदाबाद हिंसाचारानंतर, गोविंद दास यांच्या कुटुंबातील १३ सदस्यांनी आपला जीव वाचवला. यासाठी त्यांनी झारखंडमध्ये पलायन केले. या कुटुंबाने झारखंडमधील साहिबगंजच्या राजवाड्यात आश्रय घेतला. मुर्शिदाबादमध्ये नाश्त्याचे दुकान चालवणारे गोविंद दास (७२) आणि त्यांचा ४० वर्षांचा मुलगा हिंसाचारात मारला गेला.
दुपारी सुरू झालेला हिंसाचार रात्री उशिरापर्यंत सुरू होता. जेव्हा मालदा आणि बहरामपूर येथून सैन्य आले आणि या भागात पोहोचले तेव्हा हिंसाचार नियंत्रणात आणता आला. जमावाने आधी राष्ट्रीय महामार्ग ३४ रोखला. पोलिसांनी त्यांना हटवण्यास सुरुवात केली तेव्हा दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी पुन्हा अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या. लाठीचार्ज झाला. दोन दिवसांपूर्वीही मुर्शिदाबाद पोलिसांवर हल्ला झाला होता. त्यानंतर आंदोलकांनी दोन वाहने पेटवून दिली. एनआरसीच्या काळातही मुर्शिदाबादमध्ये प्रचंड हिंसाचार झाला.
या कुटुंबातील सदस्य हृदय दास यांनी सांगितले की, १२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सुमारे ५०० दंगलखोरांनी त्यांच्या काका आणि भावाला दुकानाबाहेर ओढले आणि धारदार शस्त्रांनी त्यांची निर्घृण हत्या केली. यानंतर, दंगलखोरांनी बाजारपेठेतील सर्व दुकाने आणि आजूबाजूच्या परिसरातील ७० ते ८० घरांची तोडफोड केली. एवढेच नाही तर महिलांशीही गैरवर्तन केले.
शुक्रवारी मुर्शिदाबादच्या सुती येथे पहिल्यांदा हिंसाचार सुरू झाला. त्यानंतर जांगीपूर येथील पोलिस दल घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली. दरम्यान, सुतीपासून १० किमी दूर असलेल्या समशेरगंजमधूनही दंगलीची बातमी आली. सुती येथील महामार्गावरील जाम हटवण्यात पोलिस अडकून राहिले. पोलीस शमशेरगंजपर्यंत पोहोचू शकले नाहीत, तिथे हिंसाचार सुरूच राहिला. अशा परिस्थितीत, केंद्रीय दल बीएसएफला उतरावे लागले, तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.