शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Atal Bihari Vajpayee: ...म्हणून वाजपेयींच्या आयुष्यात 13 क्रमांकाला होतं महत्त्वाचं स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 08:58 IST

वाजपेयींच्या आयुष्यातील बऱ्याच घडामोडींमागे 13 आकडा

नवी दिल्ली: माजी पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी यांचा आज पहिला स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त नवी दिल्लीतील सदैव अटल स्मृती स्थळावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी वाजपेयींना आदरांजली वाहिली. १६ ऑगस्ट २०१८ रोजी वाजपेयींनी अखेरचा श्वास घेतला. त्याआधी बराच कालावधीपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. पत्रकार ते पंतप्रधान असा प्रवास करणाऱ्या वाजपेयींत्या राजकीय आयुष्यात 13 या क्रमांकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अटलबिहारी यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी या आकड्याभोवतीच फिरताना दिसतात. अनेकदा या क्रमांकामुळे वाजपेयींना फटका बसला. मात्र वाजपेयींनी याच आकड्याच्या मदतीनं अनेक संकटांवर मातही केली.अटलबिहारी वाजपेयींनी 13 मे 1996 रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मात्र त्यांना बहुमत सिद्ध करता आलं नाही. त्यामुळे 13 दिवसांमध्ये त्यांना पंतप्रधानपद सोडावं लागलं. वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले, त्यावेळी त्यांचं सरकार 13 महिन्यांमध्ये कोसळलं. वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, त्यावेळी 13 पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला होता. 13 ऑक्टोबर 1999 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घ्यायची असं त्यांनी ठरवलं होतं. मात्र त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. 13 क्रमांक तुमच्यासाठी अशुभ आहे, असं सहकाऱ्यांनी वाजपेयींना सांगितलं. मात्र तरीही वाजपेयींनी ऑक्टोबर 1999 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांना पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केला. हिंदू धर्मात 13 आकडा महत्त्वपूर्णहिंदू धर्मातील मान्यतेनुसार, 13 आकड्याला मोठं महत्त्व आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, तेरावा दिवस त्रयोदशीचा असतो. त्रयोदशी पवित्र समजली जाते. त्रयोदशीला शंकरासाठी उपवास केला जातो. सुखसमृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी या दिवशी व्रत केलं जातं. त्यामुळेच 13 या आकड्याला हिंदू धर्मात मोठं महत्त्व आहे.  

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBJPभाजपा