लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न उधळला!, तीन दिवसांत १३ दहशतवादी गारद
By Admin | Updated: June 9, 2017 23:39 IST2017-06-09T23:39:45+5:302017-06-09T23:39:45+5:30
काश्मीरच्या उरी भागात नियंत्रण रेषेवर घुसखोरी करणाऱ्या सहा अतिरेक्यांना सैन्याने शुक्रवारी ठार केले. गत तीन दिवसांत घुसखोरीचा हा तिसरा प्रयत्न हाणून पाडण्यात आला

लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न उधळला!, तीन दिवसांत १३ दहशतवादी गारद
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 9 : काश्मीरच्या उरी भागात नियंत्रण रेषेवर घुसखोरी करणाऱ्या सहा अतिरेक्यांना सैन्याने शुक्रवारी ठार केले. गत तीन दिवसांत घुसखोरीचा हा तिसरा प्रयत्न हाणून पाडण्यात आला असून, यात एकूण १३ अतिरेक्यांना ठार करण्यात आले आहे.
याबाबत माहिती देताना सैन्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे अतिरेकी सीमेपलीकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर सैन्याने गुरुवारीच उरी भागात विशेष मोहीम चालविली होती. या चकमकीत सहा अतिरेक्यांना ठार करण्यात आले. नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करून अतिरेकी पाठविण्याचे पाकिस्तानचे अनेक प्रयत्न गत २४ तासांत हाणून पाडण्यात आले आहेत. कुपवाडाच्या माछिल आणि नौगाम सेक्टरमध्ये तसेच बांदीपोराच्या गुरेज भागात ही घुसखोरी झाली. ठार मारण्यात आलेल्या दहशतलाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच या दहशतवाद्यांकडे जीपीएस सिस्टीमही आढळली आहे