शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

१३... मालेवाडा... वन

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST

(फोटो)

(फोटो)
वनरक्षकांच्या निवासस्थानांची दैनावस्था
बोटेझरी वनपरिक्षेत्र : वन विभागाचे दुर्लक्ष
मालेवाडा : भिवापूर तालुक्यातील बोटेझरी वनपरिक्षेत्रात बोटेझरी, मालेवाडा व सालेभट्टी येथे वनरक्षकांसाठी निवासस्थानांचे फार पूर्वी बांधकाम करण्यात आले होते. कित्येक वर्षांपासून देखभाल व दुरुस्ती करण्यात न आल्याने त्या निवासस्थानांची दैनावस्था झाली आहे.
बोटेझरी वनपरिक्षेत्रांतर्गत भिवापूर तालुक्यातील बोटेझरी, मालेवाडा, सुकळी, सालेभट्टी या परिसरातील जंगलांचा समावेश करण्यात आला आहे. या जंगलांच्या देखभाल व संरक्षणासाठी या ठिकाणी काही वनरक्षकांची नियुक्तीही करण्यात आली. ग्रामीण भागात वनरक्षकांना राहण्यासाठी योग्य जागा मिळत नसल्याने त्यांच्या मुख्यालयी निवासस्थानांचे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या वास्तव्याचा प्रश्न त्यावेळी सुटला होता.
ही सर्व निवासस्थाने कौलारू आहेत. या निवासस्थानांची कित्येक वर्षांपासून वन विभागाने दुरुस्ती केली नाही. त्यामुळे निवासस्थानांवरील कवेलू फुटले असून, ते बदलविण्यात आले नाही. बहुतांश भिंतीना मोठमोठ्या तडा गेल्या असून, काही निवासस्थानांच्या भिंती कोसळल्या आहेत. पावसाळ्यात ही निवासस्थाने मोठ्या प्रमाणात गळत असून, ती आता राहण्यायोग्य राहिलेली नाहीत.
हल्ली या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर वाढला असून, उपद्रव आणि वणव्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वनरक्षकांना रात्री-बेरात्री मुख्यालय गाठावे लागते. रात्र काढण्यासाठी योग्य निवासस्थान नसल्याने वनरक्षकांनाच विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे वन विभागाने या निवासस्थानांची वेळीच दुरुस्ती करावी, अशी मागणी वन कर्मचाऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
***