लोकशाही दिनात १२४ तक्रारी अर्ज
By Admin | Updated: April 5, 2016 00:14 IST2016-04-05T00:14:13+5:302016-04-05T00:14:13+5:30
जळगाव - जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या लोकशाही दिनात विविध विभागासंदर्भात १२४ तक्रारी अर्ज प्राप्त झाले. या तक्रारी संबधित विभागांकडे पाठवित त्यांचे निवारण करण्याची सूचना जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी केली.

लोकशाही दिनात १२४ तक्रारी अर्ज
ज गाव - जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या लोकशाही दिनात विविध विभागासंदर्भात १२४ तक्रारी अर्ज प्राप्त झाले. या तक्रारी संबधित विभागांकडे पाठवित त्यांचे निवारण करण्याची सूचना जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी केली.दुपारी तीन वाजता झालेल्या लोकशाही दिनाला जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, जिल्हा उपनिबंधक संजय राऊत, उप मुख्यकार्यकारी अधिकारी मिनल कुटे तसेच सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्राप्त झालेले विभागनिहाय अर्ज पुढील प्रमाणे- जिल्हा उपनिबंधक सह. संस्था -१८, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद -२०, पोलीस अधीक्षक -१२, अधीक्षक भूमी अभिलेख -१०, अधीक्षक अभियंता म. रा. वि. मं. -५, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क -१, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी -१, अधीक्षक अभियंता लघु पाटबंधारे -१, जिल्हा अग्रणी बँक ( सेंट्रल बँक ऑफ इंडिया ) - १, महिला व बाल कल्याण अधिकारी - १ व महसूल प्रशासनाच्या संदर्भात ५४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.