1200 pillars will be ready for Ram temple in Ayodhya | 1200 खांब अयोध्येत राममंदिरासाठी तयार होणार

1200 खांब अयोध्येत राममंदिरासाठी तयार होणार

त्रियुग नारायण तिवारी।

अयोध्या : राममंदिराच्या पायासाठी १,२०० खांबांच्या निर्मितीचे काम १५ आॅक्टोबरच्या सुमारास सुरू होईल व जून २०२१ पर्यंत पूर्ण होईल, असे राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी म्हटले. या कामानंतर पायावरील कामाला सुरुवात होईल. त्यावर राफ्टचा प्लॅटफॉर्म बनेल आणि मग त्यावर सहा फूट उंच ढाचा. या ढाच्यावर मंदिराची निर्मिती होईल. जेथे राममंदिर होणार आहे तेथे टेस्ट पिलरचे काम होत आहे. यासाठी तीन पिलरची निर्मिती केली जात असून, त्याच्या चाचणीचे काम पूर्ण झाल्यानंतर १५ आॅक्टोबरपासून इतर खांबांची निर्मिती होईल, असे मिश्र म्हणाले.

चाचणीचे काम पूर्ण झाल्यानंतर राममंदिर बांधकामाला वेग येईल आणि जून २०२१ पर्यंत मंदिरासाठी आवश्यक
1,200
खांब बनवले जातील. पाया तयार झाल्यावर मंदिराच्या वरच्या भागाचे काम सुरू होईल.
2022
मध्ये राम जन्मभूमी मंदिराच्या एका तळाचे कार्य पूर्ण होईल, असे समजते. १,२०० खांब जमिनीत
100
१०० फूट खाली असतील.
त्यावर मंदिर उभे राहील.
१,२०० खांबांवर
06
फूट उंचीचा ढाचा
असेल व त्यावर
मंदिर उभे
राहील.

खांबांच्या चाचणीचे पूर्ण काम आयआयटी (रुरकी) आणि आयआयटीच्या (चेन्नई) देखरेखीत केले जात आहे. त्यात जमिनीची मजबुती आणि भार सहन करण्याची क्षमताही तपासली जात आहे.

खांबांनाही मिळेल सुरक्षा
पाया तयार केल्यानंतर मंदिराचा वरचा भाग तयार
केला जाईल. जे खांब बनवले जाणार आहेत. त्याच्या
काठाकाठाला सुरक्षा भिंतही उभी केली जाणार आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 1200 pillars will be ready for Ram temple in Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.