पंजाबमधील अमृतसरमध्ये विषारी दारू पिऊन १२ जणांचा मृत्यू झाला. तर ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पाच जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. हे संपूर्ण प्रकरण मढई गाव आणि मजिठा येथील भागली गावाचे आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसर जिल्ह्यातील मजिठा येथील मधाई गाव आणि भागली गावात विषारी दारू पिऊन १२ जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तर ५ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
मिळालेल्या माहितीनुसार, विषारी दारू पिल्याने १२ जणांचा मृत्यू झाला. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मुख्य आरोपी प्रभजीत सिंगला अटक करण्यात आली आहे. प्रभजीत सिंग हा बनावट दारू पुरवण्यामागील सूत्रधार आहे. त्याच्याविरुद्ध उत्पादन शुल्क कायद्याच्या कलम १०५ बीएनएस आणि ६१अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय प्रभजीतचे भाऊ कुलबीर सिंग उर्फ जग्गू आणि साहिब सिंग उर्फ सराई, गुरजंत सिंग, निंदर कौर यालाही अटक करण्यात आली आहे.
संपूर्ण बनावट दारू नेटवर्कची चौकशी केली जात आहे. सरकारने दारू माफियांवर कडक चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर या घटनेमुळे संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंजाबमध्ये विषारी दारूमुळे मृत्यूची ही पहिलीच घटना नाही. याआधीही पंजाब, बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून अशी प्रकरणे समोर आली आहेत.