आॅनलाईन नियुक्त्यांत १२% वाढ

By Admin | Updated: March 5, 2015 23:03 IST2015-03-05T23:03:53+5:302015-03-05T23:03:53+5:30

फेब्रुवारी महिन्यात आॅनलाईन नियुक्त्यांमध्ये तब्बल १२ टक्क्यांची वाढ झाली. नोकरदारांना यात मोठी मागणी होती.

12% increase in online appointment | आॅनलाईन नियुक्त्यांत १२% वाढ

आॅनलाईन नियुक्त्यांत १२% वाढ

नवी दिल्ली : फेब्रुवारी महिन्यात आॅनलाईन नियुक्त्यांमध्ये तब्बल १२ टक्क्यांची वाढ झाली. नोकरदारांना यात मोठी मागणी होती.
माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार क्षेत्राने नोकऱ्यांची मोठी संधी उपलब्ध करून दिली. जानेवारी २०१५ मध्ये सर्वांत जास्त नोकऱ्या माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार क्षेत्राने दिल्या. जानेवारी- फेब्रुवारीदरम्यान या क्षेत्राच्या मागणीत सरासरी सात टक्क्यांची वाढ झाली.
क्षेत्रनिहाय विचार केला तर सल्ला सेवा व वाहन क्षेत्रात फेब्रुवारी २०१५ तील मागणीत क्रमश: १९ व १८ टक्क्यांची वाढ झाली. बांधकाम क्षेत्रात १६ टक्क्यांची वृद्धी झाली, असल्याची माहिती आहे.

Web Title: 12% increase in online appointment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.