शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

प्रद्युम्न हत्या: माझ्या मुलाला अडकवलं जातंय, आरोपी विद्यार्थ्याच्या वडिलांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 13:19 IST

रायन इंटरनॅशनल शाळेत झालेली प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्याची हत्या जेवढी खळबळजनक होती सीबीआयचा तपास देखील तितकाच खळबळजनक राहीला आहे.

गुरुग्राम : रायन इंटरनॅशनल शाळेत झालेली प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्याची हत्या जेवढी खळबळजनक होती सीबीआयचा तपास देखील तितकाच खळबळजनक राहीला आहे. या प्रकरणात सीबीआयच्या पथकाने त्याच शाळेत शिकणा-या 11 वीच्या विद्यार्थ्याला अटक केली असून त्याला दुपारी बालन्यायलयात हजर केले जाणार आहे. परीक्षा आणि पालक-शिक्षक मीटिंग टाळण्यासाठी या विद्यार्थ्याने प्रद्युम्न ठाकूरची हत्या केली अशी खळबळजनक माहिती सीबीआयने दिली आहे. दुसरीकडे अटक केलेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी माझ्या मुलाला अडकवलं जात असल्याचा दावा केला आहे. अटक करण्यात आलेला आरोपी विद्यार्थी स्वभावाने तापट असल्याची माहिती आहे. प्रद्युम्नची हत्या झाली त्यावेळी हा विद्यार्थी शाळेच्या बाथरूमध्ये उपस्थित होता, असा संशय सीबीआयच्या तपास पथकाला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या विद्यार्थ्यावर संशय बळावला. त्यानंतर 11 वीच्या सर्व विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आली कारण फुटेजमध्ये विद्यार्थ्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. चौकशीनंतर सीबीआय पथकाने आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं. दरम्यान, माझा मुलगा निर्दोष असून त्याला या प्रकरणात अडकवलं जात असल्याचा दावा विद्यार्थ्याच्या वडिलांनी केला आहे. “माझ्या मुलानेच प्रद्युम्नच्या हत्येची माहिती सर्वात आधी शिक्षक आणि शाळेच्या माळ्याला माहिती दिली होती,” असंही त्याच्या वडिलांनी सांगितलं. 'सीबीआयने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत माझी आणि मुलाची चौकशी केली. त्यानंतर मुलाला ताब्यात घेतलं. सीबीआयने आधी पण त्याची चार-पाच वेळा चौकशी केली होती. शिवाय मुलाच्या स्कूलबॅगसह इतर सामानही जप्त केलं होतं. शिवाय गुरुग्राम पोलिसांनीही तपासादरम्यान सीआरपीसीचं कलम 164 अंतर्गत त्याचा जबाब नोंदवला आहे, असंही ते म्हणाले. याविरोधात मी गुरुग्राम कोर्टात दाद मागण्याच्या तयारीत आहे, असंही विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितलं.काय आहे प्रकरण?8 सप्टेंबर रोजी गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलच्या शौचालयात प्रद्युम्न ठाकूरची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती.  याप्रकरणी स्कूल बसचा कंडक्टर अशोक कुमारसह तीन जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी अशोक कुमारने हत्या केल्याची कबुली दिली होती. पण नंतर कोर्टात त्याने जबाब फिरवला. दबावात येऊन मी हत्या केल्याची कबुली दिली होती, असं अशोक कुमारने सांगितलं.

टॅग्स :Ryan International Schoolरेयान इंटरनॅशनल स्कूलStudentविद्यार्थीMurderखून