शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

महाराष्ट्रामधील ११ जण ‘पद्म’ पुरस्काराचे मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 6:36 AM

आदिवासी भागात आरोग्यसेवेचे काम करणारे डॉ. रवींद्र व स्मिता कोल्हे, लातूरमध्ये वैद्यकीस सेवा देणारे डॉ. अशोक कुकडे गायक-संगीतकार शेकर महादेवन या ११ जणांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कार जाहीर केले असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, लार्सन अँड टुब्रोचे अनिलकुमार नाईक, प्रख्यात नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे, आदिवासी भागात आरोग्यसेवेचे काम करणारे डॉ. रवींद्र व स्मिता कोल्हे, लातूरमध्ये वैद्यकीस सेवा देणारे डॉ. अशोक कुकडे गायक-संगीतकार शेकर महादेवन या ११ जणांचा समावेश आहे.प्रख्यात लोकगायिका तीजनबाई यांना ‘पद्मविभूषण’ तर नामवंत पत्रकार स्व. कुलदीप नय्यर यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. हुकूमदेव यादव हेही यंदा ‘पद्मभूषण’चे मानकरी ठरले आहेत. याखेरीज अलीकडेच निधन झालेले अभिनेते कादर खान, क्रिकेटपटू (पान ११ वर)(पान १ वरुन) गौतम गंभीर, नृत्यदिग्दर्शक प्रभू देवा आणि माजी अधिकारी एस. जयशंकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे व डॉ. अनिलकुमार नाईक यांना पद्मविभूषण किताबाने तर डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण किताबाने सन्मानित करण्यात येणार आहे. पद्मश्री किताब मिळणाऱ्यांमध्ये शंकर महादेवन, डॉ. कोल्हे दाम्पत्य, अभिेनेता मनोज वाजपेयी, दिनयार कॉन्ट्रॅक्टर, सामाजिक कार्यकर्ते सुदाम काटे, साहित्यिक नगीनदास संघवी, वन्यप्राणी सेवा कार्यकर्ते शब्बीर सय्यद यांचा समावेश आहे.यंदाच्या ११२ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यापैकी चार जणांना पद्मविभूषण, १४ जणांना पद्मभूषण आणि ९४ जणांना पद्मश्री किताब जाहीर झाले आहेत. यामध्ये २१ महिला असून, ११ परदेशी नागरिक आहेत. कादर खान यांचा उल्लेख कॅनडामधील रहिवासी असा आहे. तर तीन जणांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. याखेरीज यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे एका तृतीयपंथी व्यक्तीचीही पद्म पुरस्कारासाठी सरकारने निवड केली आहे.