शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

CoronaVirus News: देशभरात १४ दिवसांत ११ लाख रुग्ण; भारताची ब्राझिलशी बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 06:47 IST

एकाच दिवसात ९०,६३२ नव्या कोरोना रुग्णांचा उच्चांक

नवी दिल्ली : देशामध्ये रविवारी कोरोनाचे ९०,६३२ नवे रुग्ण आढळले असून हा आजवरचा उच्चांक आहे. एका दिवसात ९० हजारपेक्षा जास्त रुग्ण सापडलेला भारत हा जगातील पहिला देश बनला आहे. आता रुग्णांची एकूण संख्या ४१ लाखांवर पोहोचली आहे. बरे झालेल्यांची संख्या ३१ लाख ८० हजारांहून जास्त झालीे. १४ दिवसांत रुग्णसंख्या ११ लाखांनी वाढली. 

सर्वाधिक रुग्ण संख्येत अमेरिका प्रथम क्रमांकावर असून ब्राझिल दुसऱ्या तर भारत तिसºया स्थानी आहे. अमेरिकेत ६४,३२,१०३ तर ब्राझिलमध्ये ४१,२३,००० रुग्ण आहेत. भारताची संख्याही ४१,१३,८११ झाली आहे. सोमवारी भारत ब्राझिलवर मात करून दुसºया स्थानी पोहोचण्याची शक्यता आहे.

अनलॉकच्या काळात कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याचे चित्र असून पोलीसही याचे शिकार होत आहेत. चिंताजनक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यभरात तब्बल ५११ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. आतापर्यंतचा बाधित पोलिसांचा हा सर्वाधिक दैनंदिन आकडा आहे. तर याच कालावधीत ७ पोलिसांना जीव गमवावा लागल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा १७३ वर गेला आहे.

राज्यातील २४ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

कोरोना विषाणुचा सर्वाधिक संसर्ग आरोग्य कर्मचाºयांना झाला आहे. देशातील तब्बल ८७ हजार तर महाराष्ट्रतील २४ हजार ४८४ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पैकी राज्यातील २९२ कर्मचाºयांचा मृत्यू झाला आहे. पुणे येथे नुकतेच उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये काम पाहणाऱ्या लाईफ लाईन एजन्सीच्या ४० डॉक्टरांनी येथील असुविधांना वैतागून राजीनामे दिले आहेत.त्यामुळे महापालिकेने लागलीच या ठिकाणी ४५ डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. या सेंटरमधील सुविधा वाढविण्यात येत असल्याने दोन दिवस नव्या रुग्णांना भरती करून घेतले जाणार नाही.

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच असून सलग आठवडाभर रूग्ण संख्येत उच्चांकी वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत २३ हजार ३५० नवीन रुग्णांची नोंद झाली तर ३२८ जण दगावले. दिवसभरात ७ हजार ८२६ रुग्ण बरे होऊन परतले घरी. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारत