द्वारका परिसरातून ११ लाखांचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त
By Admin | Updated: September 4, 2015 21:54 IST2015-09-04T21:54:25+5:302015-09-04T21:54:25+5:30
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई : भद्रकाली गुन्हा दाखल

द्वारका परिसरातून ११ लाखांचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त
अ ्न व औषध प्रशासनाची कारवाई : भद्रकाली गुन्हा दाखलनाशिक : राज्य शासनाने गुटखा व सुगंधित तंबाखूवर बंदी करूनही शहरात सर्रासपणे गुटखा विक्री सुरूच आहे़ द्वारका परिसरातील हरिहर कॉलनीमध्ये अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी (दि़३) सायंकाळी टाकलेल्या छाप्यात सुमारे अकरा लाखांची सुगंधित तंबाखू व गुटख्याचा साठा जप्त केला आहे़अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नासर्डी पूल भागातील हरिहर कॉलनी, कस्तुरी पार्क येथील गाळा क्रमांक २ व ३ वर छापा टाकला़ या ठिकाणी दहा लाख ९१ हजार रुपये किमतीचे मिराज तंबाखूचे पाकिटे, हिरा गुटख्यात मिक्स करण्यासाठी वापरली जाणारी हिरा रॉयल तंबाखू हजारो पाकिटे जप्त केली आहे़राज्यात प्रतिबंधित असलेल्या तंबाखू व गुटख्याचा साठा करून व्यापारी नफा कमवित आहेत़ तसेच हा प्रकार कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून अशा प्रकारे त्यांचा साठा केला जातो आहे़ या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे विवेक पंढरीनाथ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलिसांनी अन्न व सुरक्षा मानके कायद्यान्वये अज्ञात व्यापार्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)