शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

Indian Railway Recruitment: १० वी पास, ITI उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, तब्बल ३ हजार पदांची भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 12:21 IST

Indian Railway Recruitment 2022: पूर्व रेल्वेने अप्रेंटिसच्या पदांच्या भरतीसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेमधून फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, कार्पेंटर, पेंटर यासह विविध ट्रेड्समध्ये ३ हजारांहून अधिक अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत.

नवी दिल्ली -  पूर्व रेल्वेने अप्रेंटिसच्या पदांच्या भरतीसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेमधून फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, कार्पेंटर, पेंटर यासह विविध ट्रेड्समध्ये ३ हजारांहून अधिक अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ईस्टर्न रेल्वेच्या  er.indianrailways.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.ईस्टर्न रेल्वे अप्रेंटिस भरती २०२२ साळी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ३० सप्टेंबर २०२२ पासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवार २९ ऑक्टोबर किंवा यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. केवळ ऑनलाइन पद्धतीने भरलेले अर्जच स्वीकारले जातील, असे नोटिफिकेशनमध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे.

या भरती प्रक्रियेसाठी विभागवार असलेल्या पदांची संख्या पुढीलप्रमाणे हावडा डिव्हिजन - ६५९ पदेलिलुआ वर्कशॉप - ६१२ पदे सियालदह डिव्हिजन - ४४० पदेकांचरापाडा वर्कशॉप - १८७ पदे मालदा डिव्हिजन - १३८ पदे आसनसोल वर्कशऑप - ४१२ पदे जमालपूर वर्कशॉप ६६७ पदे एकूण रिक्त पदांची संख्या - ३११५ पदे

कोण करू शकतं अर्ज या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार हा मान्यता प्राप्त मंडळाकडून १०वी किंवा १२वीची परीक्षा ५० टक्क्यांहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. त्याशिवाय संबंधित ट्रेड उदाहरणार्थ वेल्डर, शीट मेटल, वर्कर, लाइनमन, वायरमन, आणि पेंटर या विषयात एनसीव्हीटी/एससीव्हीटीकडून मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआयचं सर्टिफिकेट घेतलेलं असावं.

उमेदवारांसाठी १५ ते २४ अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन व्यवस्थित वाचून घ्यावे. या भरती प्रक्रियेसाठी जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वर्गातील उमेदवारांसाठी १०० रुपये नोंदणी शुल्क आहे. तर एससी, एसटी, दिव्यांगांसह सर्व वर्गाच्या महिला उमेदवारांना कुठलंही नोंदणी शुल्क द्यावं लागणार नाही. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेjobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शनgovernment jobs updateसरकारी नोकरी