छाप्यात सापडले १00 किलो सोने, १६३ कोटी रोख

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 06:32 AM2018-07-18T06:32:42+5:302018-07-18T06:32:54+5:30

तामिळनाडूमध्ये प्राप्तिकर विभागाने मंगळवारी एका कंपनीच्या विविध कार्यालयांवर धाडी टाकून १00 किलो सोने आणि १६३ कोटी रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.

100 kg of gold, 163 million cash found in the raids | छाप्यात सापडले १00 किलो सोने, १६३ कोटी रोख

छाप्यात सापडले १00 किलो सोने, १६३ कोटी रोख

Next

चेन्नई : तामिळनाडूमध्ये प्राप्तिकर विभागाने मंगळवारी एका कंपनीच्या विविध कार्यालयांवर धाडी टाकून १00 किलो सोने आणि १६३ कोटी रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. प्राप्तिकर खात्याला छाप्यांमधून जप्त झालेली आतापर्यंतही ही सर्वात मोठी संपत्ती असल्याचे सांगण्यात येते.
एसपीके कन्स्ट्रक्शन या बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या चेन्नईच्या १७ ठिकाणांवर, तर अरुप्पुकोटई व वेल्लोर येथील काही अशा २२ ठिकाणांवर हे छापे घालण्यात आले. राज्य महामार्गाची कंत्राटे घेणाऱ्या या कंपनीचे अनेक राजकीय नेत्यांशी संबंध आहेत. या कंपनीची एकूण मालमत्ता व प्राप्तिकर विवरणामध्ये दाखविलेली संपत्ती यांचा मेळ लागत नसल्याने ही कंपनी काहीतरी लपवत असल्याची शंका प्राप्तिकर विभागाला आली. त्यामुळे हे छापे घालण्यात आले.
सर्व १00 किलो सोने बिस्किटांच्या स्वरूपात होते. अनेक बॅगांमध्ये ही रोकड व सोने भरून बाहेर पार्क करून ठेवलेल्या वाहनांत दडवून ठेवण्यात आले होते. ही वाहने तपासली जाणार नाहीत, असा कंपनीचा अंदाज होता. प्राप्तिकर अधिकाºयांनी कार्यालयांतून कॉम्प्यूटर्स, लॅपटॉप ताब्यात घेतले आहेत. 
>मोठी कारवाई
आधी नोटाबंदीनंतर प्राप्तिकर विभागाने तामिळनाडूतील एका कंत्राटदाराकडून तब्बल ११0 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती. त्यानंतरही ही सर्वात मोठी कारवाई आहे.

Web Title: 100 kg of gold, 163 million cash found in the raids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं