शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

UP Yogi Adityanth: योगी सरकारचे 100 दिवस; 74 हजार लाउडस्पीकर हटवले, 844 कोटींची अवैध संपत्ती जप्त आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 15:12 IST

उत्तर प्रदेशातील योगी सरकार 2.0 ने 100 दिवसांच्या कामाची पुस्तिका जारी केली आहे, यात 11 मोठ्या निर्णयांची माहिती दिली.

लखनौ: उत्तर प्रदेशातीलयोगी आदित्यनाथ सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला सोमवारी 100 दिवस पूर्ण झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 100 दिवसांच्या कामाचा आढावा एका पुस्तकातून जनतेपुढे मांडला. योगी सरकारने या 100 दिवसांत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यात अवैध माफियांवर कारवाई, त्यांची संपत्ती जप्त करणे यांसह अनेक मोठे निर्णय घेतले.

सरकार स्थापन झाल्यानंतर सीएम योगींनी आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री योगी यांनी त्यांच्या मंत्री आणि विभागांसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा तयार केला होता. सरकार स्थापन झाल्यानंतर 100 दिवस, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष आणि 5 वर्षांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. यानुसार योगी सरकारने अकरा महत्वाचे निर्णय घेतले.

योगी सरकारचे महत्त्वाचे निर्णय

  1. सरकार स्थापन होताच 100 दिवस, 6 महिने आणि पाच वर्षांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले. 
  2. शेतकऱ्यांना एक लाख 74 हजार कोटी रुपयांचा उसाचा भाव दिला.
  3. ग्राउंड ब्रेकिंग सोहळा 3आयोजित, 80 हजारांहून अधिक गुंतवणूक.
  4. युवकांना रोजगार देण्यासाठी राज्यभर कर्ज मेळावे आयोजित.
  5. 100 दिवसांत 10 हजार पोलिस भरतीचे निर्धारित उद्दिष्ट पूर्ण केले.
  6. 100 दिवसांत गुन्हेगार आणि माफियांकडून 844 कोटींची बेकायदेशीर मालमत्ता जप्त केली.
  7. धार्मिक स्थळांवरून 74,700 लाऊडस्पीकर काढण्यात आले, त्यापैकी 17,816 शाळांमध्ये देण्यात आले.
  8. योगी सरकारने 68,784 अतिक्रमण स्थळे आणि 76,196 बेकायदा पार्किंग ठिकाणे मुक्त केली.
  9. महिलांना मोफत गॅस सिलिंडर आणि मोफत बस प्रवासाची भेट.
  10. युवा शक्ती मजबूत करणे, स्मार्टफोन आणि टॅबलेटचे वितरण.
  11. AAI आणि राज्य सरकार यांच्यात 100 दिवसांच्या आत 05 नवीन विमानतळांच्या संचालन आणि व्यवस्थापनाबाबत सामंजस्य करार.

योगींचा विरोधकांवर निशाणायावेळी सीएम योगी म्हणाले की, 2017 पूर्वी राज्यात विकासकामांबाबत मोठी अडचण होती, असे त्यांनी माध्यमांना सांगितले. यूपीला अनेक संकटाचा सामना करावा लागला. केंद्राच्या लाभदायक योजना राबवण्यात राज्य सरकारला रस नव्हता. पण 2017 नंतर त्यात बदल झाला. आज केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ राज्यात दिला जात आहे. राज्यात गुंड आणि माफियांविरोधात मोठी मोहीम राबवली जात आहे.

बेकायदा मालमत्तांवर बुलडोझर चालवला जातोयोगी पुढे म्हणाले की, 2017 पासून आतापर्यंत 844 कोटी रुपयांच्या बेकायदेशीर मालमत्ता बुलडोझरने पाडण्यात आल्या आहेत. 2273 गुन्हेगारांवर पॉस्को कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 68,784 अनधिकृत रहिवासी आणि 76,196 अनधिकृत पार्किंग मोकळे करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा