शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांच्या आवाहनाला 10 वर्षांच्या मुलाचा प्रतिसाद, घरीच तयार केला मास्क; मोदींनी 'अशा' शब्दात केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 13:09 IST

देशात लागू असलेला ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी केली. देशभरात लॉकडाऊन वाढल्यानंतर गृहमंत्रालयाकडून आज नियमावली जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क घालणं देखील अनिवार्य असल्याचे जाहीर केले आहे.

ठळक मुद्देमोदींच्या प्रेरणेतून 10 वर्षांच्या मुलाने घरीच तयार केला मास्कसंबंधित मुलाच्या काका अथवा मामाने त्याचा मास्क तयार करतानाचा फोटो ट्विट केला आहेआता सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क घालणं अनिवार्य

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसपासून बचावासाठी घरगुती साधनांचा वापर करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याचा सामान्य जनतेवरही मोठा परिणाम होत असल्याचे बघायला मिळत आहे. पंतप्रधानांच्या याच आवाहनाचा एका 10 वर्षांच्या मुलावर असा काही परिणाम झाला, की त्याने आपल्या घरीच स्वतःचा मास्क स्वतः तयार केला. यामुलाने शिलाई मशीनच्या सहाय्याने हा मास्क तयार केला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या मुलाचे कौतुक केले आहे.

हेमंत गुप्ता नामक एक व्यक्तीने ट्विटरवर आपल्या भाच्याचे किंवा पुतण्याचे काही फोटो टाकले होते. यावर त्यांनी लिहिले होते, की "मोदीजींनी घरीच तयार केलेले मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. माझ्या 10 वर्षांच्या  नेफ्यूवर (भाचा अथवा पुतण्या) याचा चांगला परिणाम झाला आहे. यामुळे त्याने घरातच स्वतःसाठी मास्क तयार केला. यावेळी तो शिलाई मशीनचा वापर कशाप्रकारे केला जातो, हेही शिकला." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुलाचे कौतुक करत "कोरोना व्हायरस विरोधातील लढाईत या मुलाने बजावलेली भूमिका नेहमीच स्मरणात राहील," असे ट्विट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केल्यानंतर आपल्या ट्विटर पेजवरील प्रोफाईल फोटो बदलला होता. यात फोटोत नरेंद्र मोदी यांनी एका गमछाचा मास्क सारखा वापर केल्याचे दिसत आहे. याचा उद्देश, कोरोनापासून बचावासाठी आपण आपल्या घरात उपलब्ध असलेल्या साहित्याचाही वापर करू शकतो, असा आहे.

सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क लावणे अनिवार्य -देशात लागू असलेला ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी केली. देशभरात लॉकडाऊन वाढल्यानंतर गृहमंत्रालयाकडून आज नियमावली जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क घालणं देखील अनिवार्य असल्याचे जाहीर केले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतGovernmentसरकारhospitalहॉस्पिटलHomeघर