शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएतील घटक पक्षांना हवी आहेत लोकसभाध्यक्षपदासह मलईदार खाती
2
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून; मंत्रिमंडळाने राज्यपालांना केली शिफारस
3
बिहारमध्ये पेपरफुटी, महाराष्ट्राच्या पालकांमध्ये तीव्र संताप, नीट युजीची विश्वासार्हता धोक्यात
4
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : निकालानंतर सुंदाेपसुंदी, भाजपच्या सर्व्हेवर शिंदेसेनेची नाराजी; अजित पवारांच्या बैठकीस आमदारांची दांडी
5
Lok Sabha Election Result 2024 : सर्व १२१ अशिक्षित उमेदवारांना नाकारले, तुमच्या खासदाराचे शिक्षण किती?
6
निवडणूक यंत्रणा नि:पक्षपाती हे निकालानेच सिद्ध केले : एस. चोकलिंगम
7
पाठिंब्याच्या मोबदल्यात जदयुचे भाजपवर दबावाचे राजकारण
8
मुंबई विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा, देशातील सर्वोत्तम २० शिक्षण संस्थांच्या यादीत समावेश
9
बार मालकांच्या याचिका हायकोर्टाने फेटाळल्या, परवाना निलंबनाच्या कारवाईचे प्रकरण 
10
‘एमएमआर’मध्ये उपलब्ध अकरावीच्या चार लाख जागा, यंदा २५ हजार जागांची भर, महाविद्यालयांच्या संख्येतही वाढ 
11
महिला जवानाने लगावली कंगनाच्या कानशिलात; म्हणाली, आईच्या अपमानाचा घेतला बदला
12
महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकावर जमावाची दगडफेक, अधिकाऱ्यांसह १५ पोलिस जखमी
13
शेअर मार्केटमध्ये नेमकं काय घडलं? राहुल गांधींनी केला सर्वात मोठ्या घोटाळ्याचा आरोप...
14
मजेशीर Video! Dale Steyn ला अमेरिकेत T20WC साठी नेमलेला कर्मचारी शिकवतोय गोलंदाजी
15
याला म्हणतात परतावा! 1 वर्षात पैसा डबल, आजही 15% नं वाढला भाव; आता कंपनी स्प्लिट करणार शेअर?
16
TDP आणि BJP मध्ये झालं एकमत; सरकारमध्ये सहभागी होण्याचा 'असा' ठरला फॉर्म्युला?
17
नितीश कुमारांच्या अनावश्यक मागण्या मान्य करणार नाही; भाजपने स्पष्टच सांगितले...
18
कंगना रणौतला कानाखाली का मारली? CISF महिला जवानाने सांगितलं कारण; व्हिडीओ व्हायरल
19
मारहाणीच्या घटनेवर कंगनानं मौन सोडलं, चंदीगड विमानतळावर नेमकं काय घडलं? सर्व VIDEOमध्ये सांगितलं
20
उद्धव ठाकरे पुन्हा एनडीए'मध्ये जाणार का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

अहमदाबादमध्ये जगन्नाथ रथयात्रेदरम्यान भीषण अपघात; बाल्कनी कोसळल्याने १५ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 6:05 PM

अहमदाबादमध्ये रथयात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे.

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये रथयात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. रथयात्रेदरम्यान घराची बाल्कनी कोसळल्याने अनेक जण जखमी झाले असून घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. इमारतीच्या बाल्कनीत उभे राहून रथयात्रा पाहत होते. दरम्यान, अचानक तिसऱ्या मजल्यावरची बाल्कनी खाली पडली अन् मोठा अपघात झाला. अपघाताच्या वेळी बाल्कनीत लहान मुले आणि महिलाही उभ्या होत्या.

अचानक झालेल्या अपघातामुळे सर्वजण ढिगाऱ्यासह खाली पडले. याशिवाय इमारतीचा ढिगारा खाली उभ्या असलेल्या लोकांवर पडला, त्यामुळे लोक गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात १० ते १५ जण जखमी झाल्याचे समजते. अहमदाबादमधील दरियापूर काडिया नाक्याजवळ एका बाल्कनीचा स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडली. जखमींना स्थानिकांनी जवळच्या रूग्णालयात दाखल केले आहे.

जखमींमध्ये २ लहानग्यांचा समावेश तिसऱ्या मजल्यावरची बाल्कनी पडल्याने खालच्या मजल्यावरून रथयात्रा पाहणाऱ्या लोकांनाही दुखापत झाली. काही किलोमीटर अंतरानंतर यात्रा संपणार असतानाच ही दुर्घटना घडली. माहितीनुसार, जखमींमध्ये २ मुले, ३ महिला आणि ६ पुरुषांचा समावेश आहे. सर्व जखमींना जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.

टॅग्स :GujaratगुजरातahmedabadअहमदाबादSocial Viralसोशल व्हायरलAccidentअपघात