१०... रामटेक

By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:34+5:302015-02-11T00:33:34+5:30

(फोटो)

10 ... Ramtek | १०... रामटेक

१०... रामटेक

(फ
ोटो)
तालुक्यातील बेरोजगारांना काम द्या!
उद्योग उभारण्याची मागणी : तहसीलदारांना निवेदन
रामटेक : उद्योगांअभावी रामटेक तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. ही बेरोजगारी दूर करण्यासाठी तालुक्यात मोठे उद्योग उभारण्याची मागणी तहसीलदार प्रसाद मते यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली.
रामटेक तालुका हा पर्यटनासाठी ओळखला जातो. मात्र, या तालुक्यात एकही मोठा उद्योग आजवर उभारण्यात आला नाही. पर्यटनातूनही रोजगारनिर्मिती करण्यात आली नाही. त्यामुळे तालुक्यातील बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उद्योगांना लागणाऱ्या बहुतांश मूलभूत सुविधा तालुक्यात अस्तित्वात आहेत. परंतु उद्योग उभारण्यासंदर्भात शासकीय पातळीवरून प्रयत्न केले जात नाही. रामटेक शहराच्या सौंदर्यीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला. पण त्या निधीतूनही रोजगारनिर्मिती झाली नाही. स्वयंरोजगारासाठी कर्जपुरवठा केला जात नाही, असेही या निवेदनात नमूद केले आहे.
तालुक्यातील संपूर्ण परिस्थिती विचारात घेता तालुक्यात मोठे उद्योग उभारावेत, राष्ट्रीयीकृत बँकेतून सुशिक्षित बेरोजगारांना ११५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण उपलब्ध करून द्यावे, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची हमी द्यावी यासह अन्य मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. शिष्टमंडळात ॲड. आनंद गजभिये, संजय बिसमोगरे, ॲड. प्रफुल्ल अंबादे, हरिहर अपराजित, कैलास रहाटे, निसार अली सय्यद, रामानंद अडामे, बालचंद बादुले, गंगाप्रसाद डोंगरे, मंगलसिंग खंडाते, विक्रम बिसमोगरे, विजय खरे यांच्यासह अन्य तरुणांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)
***

Web Title: 10 ... Ramtek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.