शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

राज्यसभेच्या १० जागा, ११ उमेदवार; निवडणुकीत 'समाजवादी पार्टी'ला बंडखोरीची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 11:13 IST

एकीकडे राज्यसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या नेत्यांमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशातीलराज्यसभा निवडणूक रंजक बनली आहे. वास्तविक, यूपीमध्ये राज्यसभेच्या १० जागा आहेत, तर उमेदवारांची संख्या ११ झाली आहे. यूपीमध्ये भाजपाने ८ उमेदवारांची घोषणा केली आहे, तर समाजवादी पक्षाने तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. समाजवादी पक्षाचे मित्रपक्ष दूर जाऊ लागले, तेव्हा भाजपाने संजय सेठ यांना आठवे उमेदवार म्हणून उभे केले.

एकीकडे राज्यसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या नेत्यांमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, तुरुंगात असलेल्या आमदारांची मते मिळविण्यासाठी सपा कायदेशीर प्रक्रियेची मदत घेत आहे. राज्यसभेचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर समाजवादी पक्षाचे आमदार इंद्रजीत सरोज हे त्यांच्या ३-४ आमदारांसह भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. इंद्रजीत सरोज हे भाजप आमदार रामचंद्र प्रधान यांचे निकटवर्तीय आहेत. त्याचवेळी पीडीएकडे दुर्लक्ष करून राज्यसभेचे उमेदवार उभे केल्याचा आरोप समाजवादी पक्षाकडून केला जात आहे.

पल्लवी पटेल, स्वामी प्रसाद हे पक्षासाठी अडचणीचे ठरले-

अपना दल (कामेरवाडी) आमदार पल्लवी पटेल यांनी यापूर्वीच समाजवादी उमेदवारांना मतदान न करण्याचे जाहीर केले आहे. पीडीएची (मागास-दलित-अल्पसंख्याक) काळजी घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. स्वामी प्रसाद यांचे खास माजी आमदार ब्रिजेश प्रजापती यांनीही पक्षाविरोधात आघाडी उघडली आहे. पीडीए समर्थक जया बच्चन आलोक रंजन यांना मतदान करणार नसल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाच्या महासचिव पदाचा राजीनामा देणारे स्वामी प्रसाद मौर्य प्रयागराजमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार आहेत.

यूपीमध्ये राज्यसभेच्या १० जागा, ११ उमेदवार

समाजवादी पक्षाने जया बच्चन, रामजी सुमन आणि आलोक रंजन यांना राज्यसभेसाठी तिकीट दिले आहे, तर भारतीय जनता पक्षाने आरपीएन सिंग, चौधरी तेजवीर सिंग, अमरपाल मौर्य, संगीता बलवंत, सुधांशू त्रिवेदी, साधना सिंह, नवीन जैन आणि संजय सेठ यांना तिकीट दिले आहे. यूपीमधून उमेदवार केले आहे.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाSamajwadi Partyसमाजवादी पार्टीUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा