राजस्थानमध्ये गॅस टँकरच्या स्फोटात १० ठार

By Admin | Updated: December 14, 2014 15:41 IST2014-12-14T15:35:31+5:302014-12-14T15:41:06+5:30

राजस्थानमध्ये जयपूरजवळ एका गॅस टँकरने पेट घेतल्याने झालेल्या भीषण स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला असून १२ जण ठार झाले आहेत.

10 killed in gas tanker blast in Rajasthan | राजस्थानमध्ये गॅस टँकरच्या स्फोटात १० ठार

राजस्थानमध्ये गॅस टँकरच्या स्फोटात १० ठार

ऑनलाइन लोकमत

जयपूर, दि. १४ -  राजस्थानमध्ये जयपूरजवळ एका गॅस टँकरने पेट घेतल्याने झालेल्या भीषण स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला असून १२ जण ठार झाले आहेत. बीलपूर गावापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या महामार्गावर शनिवारी रात्री एका गॅसच्या टॅंकरने पेट घेतला. त्यानंतर मोठा स्फोट झाला. त्यावेळी महार्गावरून इतर वाहनेही जात होती. त्यातील काही वाहनांनी पेट घेतला. या अपघातात १० जणांना आपला जीव गमवावा लागला तर १२ जण जखमी झाले आहेत.
अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती, मात्र आता पूर्ववत झाली आहे.

Web Title: 10 killed in gas tanker blast in Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.