गॅस टँकरच्या स्फोटात १० जण ठार, १२ जखमी
By Admin | Updated: December 15, 2014 04:22 IST2014-12-15T04:22:40+5:302014-12-15T04:22:40+5:30
राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील बीलापूर गावाजवळ शनिवारी मध्यरात्री एका गॅस टँकरचा स्फोट झाल्यानंतर लागलेल्या भीषण आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू

गॅस टँकरच्या स्फोटात १० जण ठार, १२ जखमी
जयपूर : राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील बीलापूर गावाजवळ शनिवारी मध्यरात्री एका गॅस टँकरचा स्फोट झाल्यानंतर लागलेल्या भीषण आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर १२ जण गंभीर जखमी झाले. टँकरचा स्फोट झाल्यानंतर महामार्गावरून धावत असलेल्या सात वाहनांनीही पेट घेतला. या अपघातामुळे वाहतूक ठप्प पडली.
मृत्युमुखी पडलेल्या १० जणांपैकी तिघांची ओळख पटली आहे. त्यात दकशूल या अवघ्या सहा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.
या अपघातामुळे एकूणच ज्वालाग्राही वायू व रसायनांची वाहतूक व सुरक्षितता तसेच महामार्गावरील अपघातानंतरचे आपत्ती व्यवस्थापन असे अनेक मुद्दे राष्ट्रीय पातळीवर चर्चेत येणे अटळ आहे. (वृत्तसंस्था)