१०... हिंगणा
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:33+5:302015-02-11T00:33:33+5:30
(फोटो)

१०... हिंगणा
(फ ोटो)फुटपाथ दुकानदारांना पर्यायी जागा द्या!तहसीलदारांना निवेदन : तहसील कार्यालयावर मोर्चाहिंगणा : मार्गावरील अतिक्रमण हटविण्यापूर्वी दुुकानांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी फुटपाथ दुकानदारांनी हिंगणा तहसील कार्यालयावर मोर्चा नेला. यावेळी राजू रणवीर यांना मागण्यांचे निवेदन सोपविण्यात आले. हिंगणा येथील हिंगणा नाका ते रायपूर मार्गाच्या कडेला अनेकांनी दुकाने थाटली आहेत. सदर दुकाने त्यांची उपजीविकेची साधने बनली आहेत. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने या दुकानदारांना सदर मार्गावरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात तसेच दुकाने उचलण्यासंदर्भात नोटीस बजावल्या आहेत. या दुकानदारांना येथून हटविण्यास शेकडो नागरिकांच्या कुटुंबीयांचा उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. त्यामुळे सदर अतिक्रमण हटविण्यापूर्वी त्या दुकानदारांना दुकाने लावण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे. या प्रकरणी वरिष्ठांशी चर्चा करून कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आश्वासन राजू रणवीर यांनी शिष्टमंडळाला दिले. या मार्चात सुधाकर तांडेकर, राजेश बोरकर, बाळासाहेब ढोले, किशोर काटकर, भगवान दवणे, कमलेश सांगोडे, वीरेंद्र साहणी, प्रफुल्ल खिरडकर, शेख सादिक, बलदेव बघेले, पिलाजी निंबूरकर, सुरेंद्र उरकुडे, मुन्ना ढोमणे, शर्मा, प्रभाकर बोरजे, संजय जोगी, सत्यपाल माने, अविनाश फटकळ, रिद्धी गौड, कैलास गुप्ता, चंद्रभान गिरी यांच्यासह दुकानदार सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)***