शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

१० कोटी लोकांचे पवित्र स्नान, महाकुंभमेळ्यात दररोज लाखो लोक, द. आफ्रिकेतूनही हजारो भाविक येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 07:05 IST

Mahakumbh 2025: उत्तर प्रदेशमध्ये भरलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करणाऱ्यांची संख्या गुरुवारी १० कोटींहून अधिक झाली आहे. या संगमावर दररोज लाखो लोक येत आहेत.

प्रयागराज - उत्तर प्रदेशमध्ये भरलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करणाऱ्यांची संख्या गुरुवारी १० कोटींहून अधिक झाली आहे. या संगमावर दररोज लाखो लोक येत आहेत. यंदाच्या महाकुंभ मेळ्यात ४५ कोटींपेक्षा अधिक लोक येतील, हा अंदाज खरा ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाकुंभला दक्षिण आफ्रिकेतील हजारो भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे, असे जोहान्सबर्गमधील भारताचे दूतावास महेश कुमार यांनी सांगितले.

महाकुंभ मेळ्याचा गुरुवारी ११वा दिवस होता. या दिवशी सकाळी ११:०० वाजेपर्यंत २३ लाखांहून अधिक भाविक स्नानासाठी आले होते. १३ जानेवारीपासून या मेळ्याला प्रारंभ झाला असून, त्यात विविध आखाड्यांच्या साधू - संतांसह देश - विदेशातून आलेल्या कोट्यवधी भाविकांनी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले. गुरुवारी सकाळी दिगंबर अनी आखाड्यामध्ये साधू-संतांनी काही गोष्टी सादर केल्या. त्यांनी ढोल - नगाऱ्यांच्या तालावर नृत्य केले. आपल्याकडे असलेल्या पारंपरिक शस्त्रास्त्रांचे त्यांनी प्रदर्शन केले. जम्मू - काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पवित्र स्नान केले.  (वृत्तसंस्था)

महाकुंभातील अपुऱ्या व्यवस्थेसाठी भाजप जबाबदार - काँग्रेसची टीकामहाकुंभ मे‌ळ्याचे नेटकेपणाने आयोजन करण्यात आलेले नाही. तिथे आलेल्या साधुसंत, जनतेला अपुऱ्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत अशी टिका काँग्रेसने उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारवर केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय व खासदार उज्ज्वल रमण सिंह यांनी आरोप केला की, महाकुंभात सामान्य माणसांऐवजी व्हीआयपींवर भाजप सरकारने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान, महाकुंभात एकता मिळते, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले.

दिव्यांगांना मोफत उपचारमहाकुंभात वैद्यकीय केंद्रांमध्ये स्वत:ची तपासणीही करून घेत असून, त्यांना मोफत उपचार देण्यात येतात. जयपूरस्थित एका संस्थेने दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अवयव उपलब्ध करून दिले आहेत. 

२७ जानेवारी हा दिवस धर्म स्वातंत्र्य दिन : ठाकूरप्रसिद्ध प्रवचनकार देवकीनंदन ठाकुर  यांनी सांगितले की, २७ जानेवारी हा दिवस धर्म स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जाणार असून या दिवशी सनातन मंडळाच्या घटनेचा मसुदा धर्म संसदेत मांडला जाणार आहे.येथील निरंजनी आखाड्यात आयोजित पत्रकार परिषदेत देवकीनंदन ठाकूर म्हणाले की, आम्हाला सनातन मंडळाची गरज आहे. सनातन मंडळा घेतल्याशिवाय आम्ही कुंभ सोडणार नाही. 

अभिनेत्री भाग्यश्रीने केले महाकुंभात पवित्र स्नानअभिनेत्री भाग्यश्री यांनी महाकुंभमध्ये पवित्र स्नान केले. त्यांनी सांगितले की, मी कुटुंबीयांसमवेत इथे आले आहे.महाकुंभ मेळ्यात निवासाची उत्तम सोय केली आहे. प्रसाधनगृहे व अन्य मूलभूत सुविधा सर्वांना उपलब्ध करून दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. महाकुंभात आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी पवित्र स्नान केले आहे.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारतHinduismहिंदुइझम