१०... भिवापूर.. वृक्षारोपण
By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:50+5:302015-07-10T21:26:50+5:30
(फोटो)

१०... भिवापूर.. वृक्षारोपण
(फ ोटो)विद्यानिकेतन शाळेच्या आवारात वृक्षारोपणभिवापूर : स्थानिक विद्यानिकेतन शाळेच्या आवारात नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. याप्रंसगी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार शीतलकुमार यादव, शाळेचे संचालक प्रमोद रघुशे, मुख्याध्यापिका ज्योती लांबट, शीतल रघुशे, अजय देवघरे आदी उपस्थित होते. शिक्षण म्हणजे निव्वळ पुस्तकी वाचन नाही. शिक्षणामुळे सर्वांगीण विकास साध्य व्हायला पाहिजे. करिअर घडविण्यासाठी विविध क्षेत्र आहे. प्रत्येक क्षेत्रात विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुण दाखविले पाहिजे, असे आवाहन शीतलकुमार यादव यांनी केले. शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संचालन बोराडे यांनी केले तर वाघमारे यांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)***